नागपुरात आणखी चौघांना ‘कोरोना’ची बाधा, आकडा 77 पार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. उपराजधानी नागपुरात कोरोनाचे आणखी चार रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यामुळे आता नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या 77 वर पोहोचली आहे.

सतरंजीपुरा येथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या संपर्कात चौघेजण आले होते. सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामधील तिघांना आमदार निवासात विलगीकरणात ठेवण्यात आले असून एकाला लोणारा येथे विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. नागपुरात आतापर्यंत 12 जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.

शांतीनगर येथील रहिवासी असून लोणारा येथे सक्तीच्या विलगीकरणात आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी त्यात एकाची भर पडली. मेयोमध्ये आता कोरोना बाधितांची संख्या 33 झाली आहे. तर मेडिकलमध्ये 26 बाधितांवर उपचार सुरू आहे. सध्या 54 करोना संशयित दाखल असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.