PAN कार्डला Aadhaar सोबत लिंक करण्याच्या मुदतीत वाढ, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार Link

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पॅन कार्डला आधार नंबर लिंक करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवल्याची माहिती केंद्रीय थेट कर मंडळाकडून (सीबीडीटी) देण्यात आली आहे. जागतिक महामारीच्या कोविड -19 मुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन पॅन कार्डला आधार कार्डाशी लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. आता ही मुदत पुढील वर्षी 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. प्राप्तीकर विभागाने सोमवारी (दि.6) ही माहिती दिला.

विभागाच्या म्हणण्यानुसार आता पॅन कार्ड 31 मार्च 2021 पर्यंत आधार कार्डशी लिंक करता येतील. यापूर्वी ही तारीख अनेकवेळा वाढवण्यात आली आहे. यावेळी कोरोना माहामारी आणि ज्यांना काही कारणास्तव पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करणे शक्य नव्हते त्यांना लक्षात घेऊन ही मुदत वाढवण्यात आली आहे. पूर्वी ही मुदत 30 जून होती आणि पॅन कार्डला आधार लिकं न करणाऱ्यांना 10 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली होती.

आयकर भरताना आधार कार्ड नंबर देणे सक्तीचे करण्यात आले आहे. केंद्र सरकारने बोगस पॅन कार्डद्वारे गैरव्यवहार रोखण्यासाठी आधार-पॅन जोडण्याचा कायदा अंमलात आणला होता. अर्थसंक्लपीय अधिवेशनात प्राप्तिकर कायद्याच्या कलम 139 अ हा कायदा संमत करण्यात आला होता. या कायद्यानुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आधार देणं सक्तीचं करण्यात आलं आहे.