Coronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर बाहेर पडण्यापुर्वी ‘या’ 10 गोष्टी आवश्य लक्षात ठेवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाउन हळू- हळू काढण्यात येत आहे आणि बऱ्याचं ठिकाणी आता दुकाने, सलून आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उघडत आहेत. दरम्यान, आता गोष्टी बदलल्या आहेत, ग्राहक व दुकानदार या दोघांकडूनही विशेष काळजी घेतली जात आहे. घर सोडताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवणे आवश्यक आहे ती म्हणजे कोरोना विषाणूचा धोका अजूनही तसाच आहे. आपणही घराबाहेर जात असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

संसर्गाच्या जोखमीकडे दुर्लक्ष करू नका
कोरोना विषाणूची प्रकरणे जगभरात सातत्याने वाढत आहेत आणि अद्यापपर्यंत कोणतीही लस तयार करण्यात आलेली नाही. लॉकडाऊन हटविण्याचा निर्णयही ढासळणारी अर्थव्यवस्था लक्षात घेऊन घेण्यात येत आहे. म्हणून घर सोडताना लक्षात घेणे गरजेचे आहे की, कोरोना विषाणू आपल्या आजूबाजूलादेखील असू शकतो आणि त्यासाठी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे आवश्यक
जरी अनेक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य केले गेले आहे, परंतु आपल्याला स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्याला बाहेर असा एखादा माणूस सापडेल, ज्याने मास्क घातलेला नाही. असेही होऊ शकते की, आपण अशा ठिकाणी अडकला आहात, जिथे सामाजिक अंतर राखले जात नाही. म्हणून, बाहेर पडताना मास्क घाला.

फक्त फिरण्यासाठी खरेदीला जाऊ नका
लॉकडाऊनमध्ये राहून कंटाळा आला असला तरीही, या सवलतीला फिरण्यासाठीचे एक साधन बनवू नका. लक्षात ठेवा कोरोना विषाणूचा धोका अद्याप टळलेला नाही आणि तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे सहज पसरतो. लोकांशी किमान संपर्क ठेवा आणि आवश्यक वस्तू खरेदी केल्यावर लवकरात लवकर घरी या.

बोटांचा कमीत कमी वापर करा
लिफ्टची बटणे किंवा दारे उघडताना कोपर किंवा पायाचा वापर करा. आपण मनगट किंवा हातांच्या कोपऱ्यानेदेखील स्विच चालू- बंद करू शकता. आपल्याबरोबर टिशू पेपर घेणे आणि वापरल्यानंतर ते डस्टबिनमध्ये टाकणे सर्वात चांगले. जर आपण दरवाजे किंवा लिफ्टसाठी कोणतेही कापड वापरत असाल तर घरी येताच ते लगेच धुवा.

सामाजिक अंतर
किराणा दुकानात किंवा वॉक वर जाताना, लोकांपासून कमीतकमी 6 फूट अंतर ठेवा. आपण आणि समोरच्या व्यक्तीत पुरेसे अंतर नाही, असे आपल्याला वाटत असल्यास आपण थोडे मागे जा किंवा त्या व्यक्तीस थोडे पुढे जाण्यास सांगा. बाहेरील लोकांव्यतिरिक्त मित्र आणि ओळखीच्या लोकांसह सामाजिक अंतर ठेवा.

फोनवर ठेवा लक्ष
बाहेर येता- जाताना आपल्या फोनकडे लक्ष द्या आणि कोणत्याही घाणेरड्या पृष्ठभागावर तो ठेवू नका. आवश्यक असल्यास तो आपल्या खिशात ठेवा. आपण आपला फोन कोणत्याही पृष्ठभागावर ठेवत नसाल तर आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही. जरी आपल्याला फोन पृष्ठभागावर ठेवण्याची आवश्यकता असेल तर ते काही टिशू पेपरवर ठेवा.

नॅपकिन्स, डिसिनफेक्टिव्ह वाइप्स आणि टिशू ठेवा
आपल्या पर्समध्ये नॅपकिन्स, डिसिनफेक्टिव्ह वाइप्स आणि टिश्यू पेपर ठेवा, आपल्याला त्यांची कधीही आवश्यकता असू शकते. याचा उपयोग दरवाजाच्या हँडलला किंवा पृष्ठभागास स्पर्श करण्यासाठी केला जाऊ शकतो. आपल्या शेजारी एखाद्याला शिंक येत असेल तर आपल्याकडे ठेवलेले टिश्यू पेपर उपयुक्त ठरेल.

कॅशचा कमीतकमी वापर करा
एकमेकांच्या संपर्कात येऊन कोरोना विषाणूचा प्रसार होतो, म्हणून रोख व्यवहार टाळा. यावेळी शक्य तितक्या ऑनलाइन पद्धतीचा वापर करा. यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका कमी होईल.

घरी येताच हात धुवा
घरातून बाहेर निघताना सॅनिटायझर सोबत ठेवा, आणि वेळोवेळी आपले हात स्वच्छ ठेवा. घरी परत आल्यावर, 20 सेकंद आपले हात साबणाने चांगले धुवा. तसेच बोटाच्या दरम्यान आणि मनगटाची स्वच्छता करा.