Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’मुळे 33 जणांचा मृत्यू, जाणून घ्या वॉर्डानुसार मृतांची संख्या

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून, गेल्या 24 तासात कोरोनाच्या संसर्गामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका महिलेचा आणि एका पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे आता पुण्यातील मृतांची संख्या 33 वर पोहचली आहे. पुणे महानगर पालिकेने वॉर्डनुसार मृतांची संख्या दर्शवणारा नकाशा प्रसिद्ध केला आहे. या नकाशानुसार 12 एप्रिल पर्यंत पुण्यात कोरोनामुळे 30 जणांचा मृत्यू झाल्याचे दर्शवण्यात आले आहे. तसेच कोणत्या वॉर्डात किती जणांचा मृत्यू झाला याची आकडेवारी देखील देण्यात आली आहे.