सोलापूर शहरात पसरतोय ‘कोरोना’, आकडा पोहचला 33 वर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर शहरातील पाच्छा पेठ भागात सापडलेला पहिला कोरोना पाँझिटिव्हनंतर आता हळूहळू हा कोरोना शहरभर पाय पसरू लागला आहे. शहरात आज, बुधवारअखेर कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 33 झाली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती आज बुधवारी सायंकाळी दिली.
आत्तापर्यंत सोलापुरात 900 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे .यापैकी 744 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 711 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ते 33 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज एका दिवसात 90 रिपोर्ट प्राप्त झाले. यातील 87 निगेटिव्ह तर 3 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. आज जे 3 रुग्ण मिळाले ,यात दोन भारतरत्न इंदिरा नगर येथील आहेत .चार दिवसापूर्वी येथील एक कोरोना बाधित महिला मृत्यु पावली होती, तिच्याशी संपर्कातील हे नातेवाईक आहेत.
तर एक रुग्ण शिवगंगा नगर (कुमठा नाका) म्हणजेच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.या भागात पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला असून हा भाग सील करण्यात येत आहे.