Coronavirus : पुण्यात आतापर्यंत 8 पोलिसांना ‘कोरोना’ची लागण; 54 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह, आयुक्तांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात 24 तास ड्युटी करणाऱ्या 8 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्व पोलिस एकाच पोलीस ठाण्यातील आहेत. दरम्यान 54 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. के. व्यकंटेशम यांनी मोठा निर्णय घेतला असून, पब्लिक प्लेसच्या सर्व ड्युट्या आणि कामे “यंग” पोलिसांना देण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही आजार असणारे किंवा गर्भवती महिला यांना कार्यालयीन कामे देण्यात आली आहेत.

देशात सर्वाधिक रुग्ण राज्यात आहेत. त्यातही पुणे आणि मुंबई कोरोनाची हॉटस्पॉट शहरे बनली आहेत. त्यामुळे शासनाला देखील पूर्ण खबरदारी घेऊन कामे करावी लागत आहेत. दरम्यान आरोग्य विभाग प्रत्यक्षात काम करत असताना डॉक्टर आणि नर्स यांना लागण झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यानंतर पोलिस विभाग रस्त्यावर उभा राहून तसेच हॉटस्पॉट ठिकाणी कर्तव्य बजावत आहे. अश्यावेळी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

पुण्यात एकाच पोलीस ठाण्यातील 8 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. एका चालकाला प्रथम लागण झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वाराटाईन केले होते. त्यानंतर परत दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. आता सोमवारी परत 5 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यात आता परियंत एकूण 8 जणांना लागण झाली आहे. त्यामुळे पूर्ण पोलीस ठाणे क्वाराटाईन करण्यात आले आहे. त्या सर्वांची कोरोना टेस्ट घेण्यात आली आहे. त्यात 54 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर काही जणांचे रिपोर्ट आलेले नाहीत.

दरम्यान या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. के. व्यकंटेशम यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पब्लिक प्लेसची कामे, हॉटस्पॉट भागात ड्युटी किंवा नाकाबंदी तसेच काम करताना नागरिकांच्या संपर्कात येण्याची कामे फक्त “यंग” पोलिसांना देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना काही आजार आहेत. किंवा जास्त वय आहे, अश्यांना फक्त कार्यालयीन कामे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर गर्भवती महिलांना पहिल्यापासूनच कार्यालयीन कामे देण्यात आली आहेत.