Coronavirus : सोलापूरमध्ये आणखी 9 नवे रूग्ण, एकुण ‘कोरोना’बाधितांचा आकडा 50 पार

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमुळे हाँटस्पाँट ठरलेल्या सोलापूर शहरनंतर आता ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकावा केल्याचे उघड झाले असून आज सांगोला तालुक्यात एक कोरोना पाँझिटिव्ह रूग्ण आढळला आहे. तर एकुण रुग्ण संख्या पन्नासवर पोहचली आहे. त्यामुळे सोलापेरकरांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, कोरोना आजारांन आता शहरात 49 इतकी संख्या गाठली आहे. तर जिल्ह्यात सांगोला तालुक्यातही 1 रुग्ण आज पॉझिटिव्ह मिळून आला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधिताची संख्या यामुळे 50 झाली, असून यातील चार जणांचा आधीच मृत्यू झाला आहे. तर 46 जणांवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शनिवारी सायंकाळी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

आज एकूण 9 रुग्ण वाढले, यात चार सोलापुरातील शांतीनगर भागातील,तर कुमठा नाका ,लष्कर येथील प्रत्येकी एक, तर मोदी भागातील दोघा जणांचा समावेश आहे.
यातील पाच जण सारी विकार झाल्याने दाखल झाले होते .त्यांच्या चाचण्याही कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत.

आत्तापर्यंत 1129 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. यातील 987 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात 937 निगेटिव्ह तर 50 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत .अजून 142 जणांचे अहवाल येणे प्रतीक्षेत आहे. आज सांगोल्यात तालुक्यातील ज्या गावात हा रुग्ण मिळून आला तेथील परिसर सील करण्यात येऊन त्याच्याशी संपर्कातील लोकांची माहिती गोळा करणं सुरू आहे.

काल संचारबंदी शिथिल केल्याच्या काळात शासकीय बंधने, आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी जवळपास 18 गुन्हे दाखल केले आहेत .यातील आरोपींची संख्या पन्नासच्या वर आहे. तसेच काल मोठ्या प्रमाणावर चारचाकी आणि दुचाकी वाहन ही पोलिसांनी जप्त केली आहेत .शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे काल शहरातील सर्व गर्दीच्या परिस्थितीवर स्वतः लक्ष ठेवून होते. ड्रोन द्वारे विविध भागातील चित्रिकरण त्यांच्यापर्यंत पोहोचत होतं .नियम मोठ्या प्रमाणावर डावलले जात असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना अधिकाराचा वापर करण्याचे आदेश दिले आणि मग गर्दी पांगली.

शहर पोलिसांनी काल ज्या कारवाई केल्या आहेत ,त्यात मास्क लावून न फिरणे दुचाकीवर तीन ते चार जणांनी फिरणे. पेट्रोल पंपावर परवानगी नसताना खाजगी व्यक्तीस पेट्रोल विकणे. मशिदीच्या स्पीकर वरून अजान देणं बंदी असताना अजान देण प्रशासनाची परवानगी न घेता गरीब वस्त्यांमध्ये अन्नधान्य वाटप करणे , डॉक्टरांची चिठ्ठी नसताना सर्दी खोकल्याचे औषध रुग्णांना विकणं अशा आरोपावरूनही काही व्यवसायिकां विरुद्ध शहरात गुन्हे दाखल केले आहेत.