सावधान ! काही सॅनिटायझरमध्ये आहे टॉक्सिक ‘मेथानॉल’, सीजीएसआयच्या तपासणी अहवालाची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सतत हात धुवा, असे आवाहन करण्यात येतं. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून सॅनिटायझरचा वापर अधिक प्रमाणात वाढला आहे. मात्र, कंज्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडियानं (सीजीएसआय) केलेल्या अभ्यासातून काही सॅनिटायझर शरीरासाठी हानिकारक आहेत, असे आढळलं आहे. 122 पैकी 5 सॅनिटायझरमध्ये टॉक्सिक मेथानॉल आढळलं आहे. तर, 45 सॅनिटायझरमधील केमिकल आणि त्याच सॅनिटायझरच्या बाटल्यांवरील माहिती मिळती जुळती नाही, असेही आढळलं आहे.

सीजीएसआयने 122 सॅनिटायझरमध्ये वापरण्यात आलेल्या केमिकल्सची तपासणी केलीय. त्यातील 4 टक्के सॅनिटाझरमध्ये टॉक्सिक मेथानॉल आढळले आहे. या मेथानॉलमुळे डोळ्यांना धोका पोहोचू शकतो आणि काहीवेणा दृष्टीही जाऊ शकते, असा धोका संभवू शकतो. 31 ऑगस्टला सीजीएसआयने आपला अहवाल प्रसिद्ध केलाय. मुंबई, नवी मुंबई, ठाणे शहरातील दुकानांत उपलब्ध असलेल्या सॅनिटायझरमधील घटकांची तपासणी केली. तसेच याचा सीजीएसआयनं अहवाल सादर केलाय. सॅनिटायझर तयार करणार्‍या कंपन्या त्यासाठी वापरण्यात आलेल्या घटकांची माहिती लेबलवर देत आहेत. मात्र, ती माहिती आणि प्रत्यक्षात सॅनिटायझरमधील घटक जुळतात की नाही? याचीही याची तपासणी सीजीएसआयने केली आहे.

राष्ट्रीय मान्यताप्राप्त प्रयोगशाळेमध्ये ऑगस्ट 2020 मध्ये गॅस क्रोमॅटोग्राफीच्या माध्यमातून सीजीएसआयनं सॅनिटायझरचे नमुने तपासले आहेत. ’सध्या अनेक दुकानं आणि केमिस्टमधून सॅनिटायझरची विक्री केली जातेय. कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. अनेक नवे उत्पादक सॅनिटायझरची निर्मिती करताहेत. त्यांच्याकडून दर्जा राखला जात नाही. उत्पादक भेसळ करत असल्याने ग्राहकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो,’ असेही सीजीएसआयने सादर केलेल्या अहवालात म्हटलंय.

हँड सॅनिटायझर ओव्हर द काऊंटर उत्पादन असून त्याच्या दर्जा अन्न आणि औषध प्रशासनाकडून तपासला जात आहे. ’सॅनिटायझरमध्ये टॉक्सिक मेथानॉलचा वापर करण्यास मनाई केली आहे. कारण टॉक्सिक मेथानॉलवर बंदी आहे. मात्र, काही उत्पादक टॉक्सिक मेथानॉलचा सॅनिटायझरमध्ये वापर केला जात आहे. ते ग्राहकांच्या शरीरासाठी हानीकारक ठरू शकतं,’ असेही सीजीएसआयनं अहवालात नमूद केलंय.