Coronavirus Lockdown : ‘ट्राय’नं टेलिकॉम कंपन्यांना लिहीलं पत्र, लवकरच वाढू शकते ‘प्रीपेड’ प्लॅनची ‘वैधता’

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रकोप पाहता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना प्रीपेड प्लॅनची वैधता वाढवण्याची मागणी केली आहे. ट्रायने म्हटले आहे की, प्रीपेड प्लॅनची वैधता वाढवल्याने लॉकडाऊन दरम्यान ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही. सोबतच ग्राहक या अवघड परिस्थितीत एकमेकांशी कनेक्ट राहतील.

ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना लिहिले पत्र
माहितीनुसार, ट्रायने देशातील दिग्गज टेलिकॉम कंपन्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात कंपन्यांना म्हटले आहे की, सगळ्या युजर्सच्या प्रीपेड प्लॅनची वैधता वाढवावी, ज्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. याशिवाय ट्रायने सगळ्या कंपन्यांकडून माहिती मागितली आहे की, लॉकडाऊन दरम्यान ग्राहकांना विना व्यत्यय सेवा देण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत.

टेलीकॉम कंपन्यांनी ट्रायच्या पत्राला दिले नाही उत्तर
सध्या तरी टेलिकॉम कंपन्यांनी ट्रायच्या पत्राला उत्तर दिले नसून प्रीपेड प्लॅनची वैधता वाढवण्याबाबत घोषणा केलेली नाही. कंपन्या लवकरच प्रीपेड प्लॅनची वैधता वाढवण्याची घोषणा करतील, अशी आशा आहे.

कोरोना व्हायरस लॉकडाऊन
२४ मार्चला पीएम मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता. जर टेलिकॉम कंपन्या या परिस्थितीत प्रीपेड प्लॅनची वैधता वाढवतील तर यामुळे ग्राहकाला जास्त फायदा होऊ शकतो.