Coronavirus : हवा आणि AC मुळे पसरतोय ‘कोरोना’चा संसर्ग, केंद्र सरकारने सांगितले खबरदारीचे उपाय; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे तांडव सुरू आहे. संसर्गाचा धोका सतत वाढत आहे. आता केंद्र सरकारने गाईडलाईन जारी केली आहे ज्यामध्ये एयरोसोल आणि ड्रॉपलेट्स ट्रान्समिशनला कोरोना व्हायरस पसरण्याचे प्रमुख कारण सांगितले आहे. एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या खोकण्याने, शिंकण्याने किंवा बोलताना काही सुक्ष्म थेंब बाहेर पडतात, त्यास ड्रॉपलेट म्हणतात. अनेकदा हे कण हवेत सुद्धा राहतात ज्यामुळे एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला संसर्ग होतो.

केंद्र सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांनी एक अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. यामध्ये एयरोसोल आणि ड्रॉपलेट्स ट्रान्समिशनला कोरोना व्हायरस पसरण्याचे प्रमुख कारण म्हटले आहे. या अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे की, हे एयरोसोल हवेत 10 मीटरचे अंतर पार करू शकतात.

अगोदर लोक केवळ ड्रॉपलेट्सला (तोंड-नाकातून निघालेले थेंब) कोरोना संसर्गाचे प्रमुख कारण मानत होते आणि एयरोसोलला जास्त महत्व देत नव्हते. परंतु आता मानले जात आहे की, हे दोन्ही महत्वपूर्ण आहे. केंद्र सरकारच्या या मार्गदर्शक तत्वांनुसार, व्हायरसने संक्रमित व्यक्तीची लाळ आणि नाकातून निघालेल्या ड्रॉपलेट्स आणि एयरोसोल, व्हायरस संसर्गाची प्राथमिक पद्धत आहे. सरकारद्वारे निर्धारित गाईडलाईन्समध्ये म्हटले आहे की, लक्षणे नसलेली व्यक्ती सुद्धा व्हायरस ट्रान्समिट करू शकतो.

अशी घ्या खबरदारी
* घरात क्रॉस व्हेंटिलेशन असावे म्हणजे बाहेरून हवा येत रहावी. खिडक्या उघड्या ठेवा. स्वच्छ हवा आत येऊ द्या.
* उन्हाळ्यात एसी किंवा कूलर लावल्यास संसर्गाचा धोका वाढतो. हे टाळा.
* योग्य व्हेंटिलेशनचा वापर केल्याने व्हायरसला रोखता येऊ शकते.
* छोट्या जागेत एसीमुळे संसर्गाचा धोका जास्त वाढतो.
* घराचे एयर फिल्टर निर्देशानुसार बदलू शकता.
* सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. वारंवार हात धुवा. हाताने तोंडाला आणि चेहर्‍याला स्पर्श करू नका.
* वारंवार स्पर्श होणारे पृष्ठभाग जसे की दरवाजांचे हँडल, लिफ्टचे बटन आणि लाईट स्विच, टेबल, खुर्ची आणि फरशीला ब्लीच किंवा फिनाईलने डिसइन्फेक्ट करा. या सर्व नियमांचे पालन करून स्वताला संसर्गापासून वाचवू शकता.