‘कोरोना’च्या रूग्णांवर प्रभावी ठरतेय ‘ही’ नवीन थेरेपी, ‘या’ पध्दतीनं होणार बचाव, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या (coronavirus) वाढत्या संक्रमणात विविध प्रकारे रुग्णावर उपचार केले जात आहेत. जोपर्यंत लस किंवा औषध येत नाही तोपर्यंत सगळ्यांनीच सावधगिरी बाळगायला हवी. कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी सध्या एंटीबॉडी थेरेपीचा वापर करून रुग्णांना नोवेल एंटीबॉडी दिली जात आहे. या थेरेपीच्या वैद्यकिय परिणामांना न्यू इंग्लँड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित केले आहे.

या उपचार पद्धती अंतर्गत संक्रमणातून मुक्त झालेल्या कोरोना रुग्णांच्या रक्तात असलेल्या मोनोक्लोनल एंटीबॉडीजची (treatment-monoclonal-antibodies) तपासणी केली. एलवाई – सीओवी 555 च्या तीन वेगवेगळ्या डोसची तपासणी केली. या अभ्यासातून प्राप्त आकडेवारीनुसार 2,800 मिलीग्राम एंटीबॉडीमुळे सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांच्या शरीरातील प्रभाव कमी होतो.

अमेरिकेतील सीडर- सिनाई मेडिकल सेंटरमध्ये कार्यरत असलेले या अभ्यासाचे सह लेखक पीटर चेन म्हणाले की, माझ्यासाठी सगळ्यात महत्वपूर्ण संशोधन म्हणजे कोरोना रुग्णांची रूग्णालयात भरती करण्याची शक्यता कमी होणे. मोनोक्लोनल एंटीबॉडीमध्ये कोरोना रुग्णांच्या संक्रमणाची गंभीरता कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे जास्तीत जास्त कोरोना रुग्ण हे रुग्णालयात दाखल न होता घरच्याघरी बरे होतात. संशोधकांच्या मते मोनोक्लोनल एंटीबॉडी कोरोना व्हायरसला चिकटलेल्या अवस्थेत असतात. त्यामुळे वाढ होण्यापासून रोखता येऊ शकते.

तसेच एलवाई-सीओवी 555 नोवेल कोरोना व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनशी जोडलेले असते. संशोधकांना असे दिसून आले आहे की, एंटीबॉडी व्हायरस आपल्या प्रतिकृती तयार करण्याची क्षमता कमी करतात. त्यामुळे संक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. सुरूवातीलाच व्हायरसला शरीराला नुकसान पोहोचवण्यापासून रोखता येऊ शकते. यासाठी जवळपास 300 रुग्णांना सहभागी करून घेतले होते. यात 100 रुग्णांच्या शरीरात एंटीबॉडीज इन्जेक्ट केल्या होत्या. जवळपास 150 रुग्णांना प्रायोगिक तत्वावर ही थेरेपी दिली होती.