Long Covid : कोरोना व्हायरसचे काही रूग्ण बरे का होत नाहीत ? कारण आले समोर

कोरोना व्हायरस (coronavirus )च्या एकुण प्रकरणाचा विचार केला तर बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. परंतु, काही लोक असेही आहेत ज्यांची लक्षणे कमी होताना दिसत नाही. अशा स्थितीला ’लाँग कोविड’ म्हटले जाते. कोरोनाची लक्षणे सर्व रूग्णांमध्ये एकसारखीच दिसत असली तरी आतापर्यंतच्या डेटानुसार थकवा एक असे लक्षण आहे, जे मोठ्या कालावधीपर्यंत पीडितांची पाठ सोडत नाही.

‘लाँग कोविड’ ची लक्षणे
याच्या लक्षणात थकवा पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर श्वासाची कमतरता, सांधेदुखी, छातीत वेदना, खोकला, वास न येणे, नाक वाहणे, लाल डोळे, चव न येणे, डोकेदुखी, कफ येणे, कमी भूख, घशात खवखव, मांसपेशींमध्ये वेदना अशी लक्षणे दिसतात.

भारतात 56,62,490 रूग्ण बरे झाले
आकड्यांनुसार देशात 56,62,490 लोक बरे झाले आहेत आणि सध्या 9,19,023 लोकांवर उपचार सुरू आहेत. जे एकुण प्रकरणांच्या 13.75 टक्के आहे. कोरानाचा मृत्युदर 1.55 टक्के आहे.

बरे होण्याचा दर वाढून 84.70 टक्के
देशात कोरोना व्हायरसची प्रकरणे मंगळवारी 65 हजारपेक्षा कमी होती. तर संसर्गातून बरे होणार्‍यांची संख्या 56 लाखपेक्षा जास्त झाली. यामुळे बरे होणार्‍यांचा दर वाढून 84.70 टक्के झाला.

आरोग्य मंत्रालयाने यावर जोर दिला आहे की, संसर्गाने मरणार्‍यांपैकी 70 टक्के लोक अन्य आजराने ग्रस्त होते. मंत्रालयाने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की, आमच्या आकड्यांची पडताळणी आयसीएमआरशी केली जाते.