फाटलं होतं ‘कोरोना’नं मृत्यू झालेल्या अमेरिकेतील पहिल्या रुग्णाचे ‘हृदय’

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे 10.11 लाख लोक आजारी पडले आहेत. त्याचबरोबर, 58,351 लोकांचा मृत्यू झाला आहे. पण आता एका अमेरिकन फॉरेन्सिक पॅथॉलॉजिस्टने असा दावा केला आहे की, कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीचे हृदय फाटले होते. या प्रकरणानंतर हे कळले की अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे झालेला हा पहिला मृत्यू होता.

हे प्रकरण आहे 6 फेब्रुवारी 2020 रोजीचे. जेव्हा कॅलिफोर्नियाच्या सॅन जोस भागात राहणाऱ्या पेट्रिशिया डो नावाच्या 57 वर्षीय महिलेचा फ्लूमुळे मृत्यू झाला होता. पण आता माहिती मिळाली आहे की, त्या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यासोबतच कोरोना विषाणूमुळे त्या महिलेचे हृदय फाटले होते.

द मर्क्युरी न्यूजनुसार, 25 एप्रिलला म्हणजेच शनिवारी पेट्रिशिया यांचे पुन्हा पोस्टमॉर्टम करण्यात आले होते. ज्यामध्ये कोरोना विषाणूमुळे त्यांचे हृदय फाटलेले असल्याचे समोर आले आहे. तथापि, पेट्रीशिया यांना हृदयविकाराचा कोणताच आजार नव्हता.

पॅट्रिशिया यांच्या नवऱ्याने सांगितले की, त्यांची पत्नी खूपच निरोगी होती. रोज व्यायाम करत होती. तिला कोलेस्ट्रॉल किंवा रक्तदाब देखील नव्हता. असे असूनही, ती आजारी कशी पडली हे मला समजले नाही. पण सुरुवातीला असे मानले गेले होते की, पेट्रीशिया यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

परंतु पोस्टमॉर्टम मधून असे आढळले की, पेट्रोशिया यांच्या हृदयाचे वॉल्व कोरोना विषाणूमुळे फुटले होते. फॉरेन्सिक पॅथॉलॉजिस्ट डॉ. जुडी मेलिनेक म्हणाले की, पेट्रीशिया यांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती आणि कोरोना विषाणू यांच्यामध्ये भयंकर युद्ध झाले होते.

डॉ. जुडीने सांगितले की, कोरोना विषाणू पेट्रिशियाच्या हृदयाच्या स्नायूपर्यंत पोहोचला होता. ज्यामुळे त्यांच्या हृदयाचे वॉल्व फुटल्यानंतर त्याने काम करणे थांबले. या कारणास्तव, पॅट्रिशिया यांचा मृत्यू झाला होता.

डॉ. ज्यूडी यांनी सांगितले की, सहसा ज्यांच्यामध्ये जास्त कोलेस्ट्रॉल असते त्यांचे हृदय फाटते. किंवा रक्तदाब रोग किंवा हृदयाच्या स्नायूशी संबंधित कोणतीही समस्या असेल त्यांचे देखील हृदय फाटते. पण पेट्रिशियाचे हृदय खूप चांगले होते. त्याचे आकार आणि वजन देखील वाढले नाही.

डॉ जुडी म्हणाले की, सामान्य हृदय कधीच फाटत नाही. पॅट्रिशिया डोचे वजन नक्कीच थोडेसे जास्त होते परंतु ते एक सामान्य आणि निरोगी महिला होत्या. त्यांना कोणत्याही प्रकारचे कोलेस्ट्रॉल किंवा हृदयचा रोग नव्हता.

जगभरातील शास्त्रज्ञांनी संशोधन केले असून कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या पाचपैकी एक रुग्ण हृदयाच्या समस्येमुळे मरण पावत असल्याचे आढळले आहे. कारण कोरोना विषाणू हृदयावर आक्रमण करीत आहे.