अमेरिकेच्या कंपनीनं चीनवर ठोकला 20 ट्रिलियन डॉलरचा ‘मुकदमा’, मुद्दाम ‘कोरोना’ व्हायरस पसरविल्याचा आरोप

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता अमेरिकेतील एका कंपनीने चीन सरकारवर 20 ट्रिलियन डॉलरचा दंड ठोठावण्याचा खटला दाखल केला आहे. या कंपनीचा आरोप आहे की चीनने या व्हायरसचा प्रसार एक जैविक शस्त्राप्रमाणे केला आहे.

अमेरिकेतील टेक्सासची कंपनी बज फोटोज, वकील लॅरी क्लेमॅन आणि संस्था फ्रीडम वाच यांनी मिळून चीन सरकार, चीन सैन्य, वुहान इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी, वुहान इंस्टीट्यूटचे डायरेक्टर शी झेनग्ली आणि चीनी सैन्याचे मेजर जनरल छेन वेई यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे.

काय आहे खटला –
या खटल्यात दावा आहे की चीन प्रशासन एक जैविक शस्त्र तयार करत आहे ज्यामुळे हा व्हायरस पसरला आणि यामुळे त्यांनी 20 ट्रिलियन डॉलरची नुकसान भरपाई मागितली आहे. एवढा तर चीनचा जीडीपी देखील नाही. त्यांनी आरोप केला की चीनने वास्तवात अमेरिकी नागरिकांना मारण्याचा आणि त्यांना आजारी करण्याचा कट रचला.

चीनवर लावण्यात आला गंभीर आरोप –
त्यांनी आरोप केला की वुहान वायरोलॉजी इंस्टीट्यूटद्वारे हा व्हायरस जाणूनबुजून सोडण्यात आला. चीनने कोरोना व्हायरसची निर्मिती जगात मोठा जनसंहार करण्यासाठी केली. खटल्यात सांगण्यात आले की जैविक शस्त्र 1925 मध्येच बेकायदेशीर घोषित केले आहे आणि या व्हायरसकडे जनसंहारासाठी दहशतवाद पसवरणारे शस्त्र म्हणू पाहिले जाऊ शकते.

अमेरिकी कंपनीने माध्यमातून आलेल्या अनेक वृत्तांचा पुरावा देत सांगितले की चीनमध्ये फक्त एक मायक्रोबायोलॉजी लॅब जी वुहानमध्ये आहे तीच नोवेल कोरोनाशी निपटू शकते. परंतु चीनने व्हायरससंबंधित त्यांची वक्तव्य राष्ट्रीय सुरक्षा प्रोटोकॉलच्या नावे लपवली आहे.
डब्ल्यूएचओचे प्रमुख गेबरेइसस यांनी सांगितले की महामारी वेगाने पसरत आहे आणि कोविड – 19 पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. जगात कोरोनाग्रस्तांची संख्या 4,00,000 पेक्षा जास्त आहे तर मृतांचा आकडा 18,000 पार गेला आहे.