Coronavirus : ‘कोरोना’चा ‘हाहाकार’ ! बारामतीमध्ये एकाचा मृत्यू, पुण्यातील मृतांचा आकडा 20 वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या सांख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच मंगळावरपासून पुण्यात कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. बुधवारी पुण्यात तब्बल १० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. आजही पुणे शहर आणि जिल्ह्यात असे २ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे यात बारामती मधील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यातील मृतांची संख्या २० वर पोहचली आहे. याबाबतची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे .

पुणे शहरात १६८ जणांना करोनाची लागण

पुण्यातील कोरोनाच्या रुग्नांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील काही भाग सील करण्यात आले आहेत. तसेच पुण्यातील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. बुधवारी विविध रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दहा रुग्णांचा मृत्यू झाला. तर गुरूवारी सकाळी दोन मृत्यूची नोंद झाली. यात बारामतीमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा बारामतीत तालुक्यातील पहिला बळी आहे. ही भाजी विक्रीचा व्यवसाय करायची. पुण्यातील ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या कुटुंबातील मुलगा, सून आणि दोन नातींनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. दोन जणांचा मृत्यू झाल्यानं पुणे जिल्ह्यात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुणे शहरात १६८ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड २२, पुणे ग्रामीण १४ असे एकूण २०४ रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत.

राज्यात कोरोनाचे नवे १६२ रुग्ण, एकूण संख्या १२९७ वर

एकीकडे राज्य सरकारकडून कृती कार्यक्रम राबवला जात असताना करोनाच्या प्रसाराचा वेग कमी होण्याऐवजी वाढत असल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. गुरूवारी १६२ जणांना संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या १२९७ वर पोहचली आहे. आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.