Lockdown : अंमली पदार्थांच्या शोधात त्यांनी केलं ‘वेषांतर’, डॉक्टरांच्या पोशाखात बाहेर पडलं अन्…

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आल्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः मद्यपान आणि अमंली पदार्थांचे सेवन करणार्‍यांचे हाल झाले आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी असणार्‍या लखनऊमध्ये अमंली पदार्थ मिळविण्यासाठी दोन तरुणाांनी डॉक्टरांनी वेशभूषा केली होती. मात्र, पोलिसांनी ऑस्टीन पॉल आणि सनी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अमंली पदार्थ मिळविण्यासाठी दोघेही डॉक्टरांसारखा पोषाख करुन रस्त्यावर भटकत होते. सुरुवातील पोलिसांनाही यांच्याबद्दल काहीच शंका आली नाही. मात्र नंतर त्यांच्या हलचालीवरुन आणि वागण्यावरुन पोलिसांनी त्यांची चौकशी केली. शहरातील पॉलिटेक्नीक क्रॉसिंगजवळ या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता तेव्हा हे दोघे डॉक्टर नसल्याचे उघड झाले. दोघेही आपल्या घरुन डॉक्टरांसारखे कपडे घालून निघाले होते.

लॉकडाउनमुळे शहरभरातील रस्त्यांवर जागोजागी पोलिसांनी तपासणी केली आहे. अशाच एका नाकाबंदीजवळ पोलिसांनी या दोघांना चौकशीसाठी थांबवले. यावेळी या दोघांनी आम्ही डॉक्टर असून करोनाच्या रुग्णांवर उपचार करतो अशी माहिती दिली. मात्र दोघांची हालचाल आणि हावभाव पोलिसांना संक्षयास्पद वाटले. दोघेही नशेत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची झडती घेतला असता स्मॅक हा हेरोईन पदार्थ मिळून आला.