Coronavirus : डॉक्टरांनी केली होती मृत्यूची बातमी देण्याची तयारी, ब्रिटनच्या पंतप्रधानांनी सांगितलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोनावर मात केलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की, त्यांच्या डॉक्टरांनी उपचारादरम्यान मृत्यूच्या घोषणेसाठी तयारी केली होती. त्यांना जिवंत ठेवण्यासाठी अनेक लीटर ऑक्सिजन देण्यात आले होते. 55 वर्षीय जॉनसन म्हणाले कि, “हा एक कठीण काळ होता. मी नाकारणार नाही. ‘स्टालिनच्या मृत्यू’च्या धर्तीवर त्यांनी योजना आखली होती. माझी परिस्थिती तितकी ठीक नव्हती आणि मला माहित होतं की आकस्मित घटनेसाठी योजना तयार आहे.

आता कोरोना विषाणूपासून मुक्त झालेले ब्रिटीश पीएम जॉनसन म्हणाले की, काही चुकल्यास काय केले जाईल याविषयी डॉक्टरांनी पूर्ण योजना आखली होती. दरम्यान, जॉनसनला आयसीयूमध्येही ठेवण्यात आले होते. हॉस्पिटलमधील उपचाराचा संदर्भ देताना जॉनसन म्हणाले की, मॉनिटरवर दिसणारा इंडिकेटर सतत चुकीच्या दिशेने जात होता. यावेळी त्यांना समजले की, कोरोना विषाणूवर कोणताही इलाज नाही.

गेल्या महिन्यात जॉनसन यांच्यावर लंडनमधील सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान जॉनसन स्वत: ला सतत प्रश्न विचारात होते कि ते कसे या परिस्थितीतून बाहेर पडतील. ते म्हणाले की, काही दिवसांत त्यांची तब्येत अत्यंत खराब झाली होती. ते निराश झाले होते. मी का बरे होत नाही हे मला समजू शकले नाही. दरम्यान, जॉनसन यांच्यासाठी चांगली गोष्ट अशी की, मंगळवारी त्यांची होणारी बायको कॅरी सायमंड्सने जॉनसन यांच्या ठीक होण्याच्या काही दिवसांनंतर मुलाला जन्म दिला. ज्यांनी आपला जीव वाचवला त्या डॉक्टरांच्या नावावरुन जॉनसन यांनी आपल्या मुलाचे नाव (निकोलस) ठेवले आहे.