Coronavirus : ‘कोरोना’ संसर्गानंतर लहान मुलांमध्ये आढळतोय ‘हा’ ‘कावासाकी’ सदृश आजार ! जाणून घ्या लक्षणांसहित सविस्तर माहिती

पोलिसनामा ऑनलाइन – भारतात ज्या मुलांमध्ये कोरोना सौम्य स्वरूपाचा आहे. यात घातक असं काहीच नाही. जरी हे घातक नसलं तरी कोरोना संसर्गाच्या 3-4 आठवड्यांनंतर त्यांच्यात कावासाकी या आजारासारखी लक्षणे आढळली आहेत.

काय आहे कावासाकी आजार ?

कावासाकी हा आजार 5 वर्षांखालील मुलांना होतो. हा आजार रक्तवाहिन्या आणि हृदयावर परिणाम करतो.

कोरोनामध्ये नेमकं काय होतंय ?

तसं पाहिलं तर अशी केसे एक लाखात एकच असते. परंतु वेळेतच हा प्रकार लक्षात आला तर धोका टाळता येतो. तसं तर कोरोनामध्ये कावासाकी डिसिज होत नाही. परंतु त्या आजारासारखी लक्षणे दिसतात. यात काही काळ हृदयाभोवती सूज येते आणि उपचारांची गरज पडते. याचं प्रमाण तसं खूप कमी आहे. म्हणून याबद्दल सर्वांना माहित असणं गरजेचं आहे.

कोरोनामध्ये कावासाकीसदृश आजार नेमका होतो तरी कधी ?

कोरोना संसर्गाच्या काळात नव्हे तर कोरोनामुक्त झाल्यानंतर किंवा कोरोनातून बरे झाल्यानंतर 3-4 आठड्यांनंतर कावासाकीसदृश आजार होतो.

कावासाकीसदृश या आजाराची लक्षणे आहेत तरी कोणती ?

– अंगावर लालसर चट्टे
– ताप
– चिडचिड करणे
– अस्वस्थ वाटणे

लहान मुलांना कोरोना संसर्गाच्या 3-4 आठवड्यांनंतर ही लक्षणे आढळतात. त्यामुळं जर लहान मुलांना कोरोनाची लागण झाली असेल तर त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं. ही लक्षणे आढळली तरी पालकांनी घाबरून जाऊ नये. कारण हा कावासाकी आजार नसून कावासाकीसदृश आजार आहे. याचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळं घाबरून न जाता अशी लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.