Coronavirus : गावी परतलेल्या 150000 लोकांना ‘होम क्वारंटाईन’चा CM योगींचा आदेश, सरपंचांकडे सोपविली ‘जबाबदारी’

लखनौ : पोलीसनामा ऑनलाइन – लॉक डाऊन सुरु झाल्यानंतर गेल्या ३ दिवसात उत्तर प्रदेशात विविध राज्यातून तब्बल दीड लाख लोक विविध मार्गाने परत आपल्या गावी आले आहेत. या सर्वांना होम क्वारंटाईन राहण्याचा आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. लॉक डाऊनच्या काळात नागरिकांना अन्न धान्य, भाजीपाला, दुध यांच्या पुरवठा करण्यासाठी पुरवठा व्यवस्था मजबूत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे.

लॉक डाऊनची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी आणि इतर राज्यातून आलेल्या लोकांना होम क्वारंटाईन रहावे, यासाठी राज्यातील ६५ हजार सरपंचांची या कामी मदत घेतली जात आहे. पंचायत पातळीवर बाहेरुन आलेल्या लोकांची यादी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

दिल्लीतील अडकल्यांसाठी बस व्यवस्था
उत्तर प्रदेशात परत येण्यासाठी आलेले हजारो लोक दिल्ली बसस्थानकावर अडकले आहेत. त्यांना राज्यात घेऊन येण्यासाठी एक हजार बसगाड्या चालविण्यात येणार आहे. त्यांच्या मार्फत राज्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून आवश्यक ती काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.