देशातील ‘या’ 6 राज्यांत कोरोना व्हायरसच्या 86.37 % केस : आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील 13 राज्यांमध्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना व्हायरसने मागील 24 तासात एकही मृत्यू झालेला नाही. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने रविवारी ही माहिती दिली. ज्या राज्यांमध्ये कोरोना व्हायरसने एकही मृत्यू नोंदला गेला नाही त्यामध्ये उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिसा, गोवा, हिमाचल प्रदेश, आसाम, मणिपुर, सिक्किम, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे. दुसरीकडे जम्मू-काश्मीर, चंडीगढ, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेट, दादरा आणि नागरा हवेली आणि दमन दिव केंद्रशासित राज्यांमध्ये कोरोनामुळे कुणाच्याही मृत्यूचे वृत्त नाही.

यासोबतच मंत्रालयाने सांगितले की, केरळ, महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, तमिळनाडु आणि गुजरातमध्ये कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकरणात वाढ झाली आहे आणि कोरोना व्हायरसची 86.37% नवी प्रकरणे याच सहा राज्यांतून आहेत. केंद्र सरकारद्वारे रविवारी सकाळी आठ वाजता जारी केलेल्या अपडेट आकड्यांनुसार भारतात मागील 24 तासात कोरोना व्हायरस संसर्गाची 16,752 नवी प्रकरणे समोर आली जी मागील 30 दिवसात आतापर्यंतची सर्वाधिक प्रकरणे आहेत. देशात संसर्गाच्या एकुण प्रकरणांची संख्या वाढून 1,10,96,731 झाली आहे. यापूर्वी 29 जानेवारीला संसर्गाची 18,855 नवीन प्रकरणे समोर आली होती.

कोरोनामुळे 113 संक्रमितांचा मृत्यू
या दरम्यान आणखी 113 संक्रमितांच्या मृत्यूनंतर महामारीने जीव गमावणार्‍यांची संख्या 1,57,051 झाली आहे. आकड्यांनुसार, संसर्गाचा उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या वाढून 1,64,511 झाली आहे, जी एकुण प्रकरणांच्या 1.48 टक्के आहे. देशात आतापर्यंत एकुण 1,07,75,169 रूग्ण संसर्गापासून मुक्त झाले आहेत. लोकांचा संसर्गापासून मुक्त होण्याचा दर 97.10 टक्के आहे.

कोरोना व्हायरसने मृत्यूचा दर 1.42 टक्के आहे. ज्या 113 लोकांचा मागील 24 तासात मृत्यू झाला आहे, त्यांच्यापैकी महाराष्ट्राचे 51, केरळचे 18 आणि पंजाबचे 11 लोक आहेत. देशात आतापर्यंत 1,57,051 लोकांचा संसर्गाने मृत्यू झाला आहे. ज्यापैकी महाराष्ट्रातील 52,092, तमिळनाडुतील 12,493, कर्नाटकातील 12,326, दिल्लीतील 10,909, पश्चिम बंगालमधील 10,266, उत्तर प्रदेशातील 8,725 आणि आंध्र प्रदेशातील 7,169 लोकांचा समावेश आहे. आतापर्यंत ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या पैकी 70 टक्केपेक्षा जास्त रूग्णांना इतर आजार होते.