Coronavirus : मुंबईत तब्बल 14 कोटींचे ‘मास्क’ जप्त

पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. खबरदारी म्हणून नागरिक मास्क, सॅनिटायझरचा वापर करत आहे. या संकटातही काही लोक फायदा उचलण्याच्या तयारीत होते. 2 रुपयांना तयार होणाारा मास्क 10 रुपयांमध्ये आणि 100 रुपयांचा मास्क 400 रुपयांमध्ये विकण्याचा डाव मुंबई पोलिसांनी उधळला आहे.

पोलिसांनी तब्बल 14 कोटी रुपये किंमतीचे मास्क जप्त केले आहे. देशातली ही सर्वात मोठी कारवाई आहे. मास्कचा साठा करुन वाढीव दराने विकण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, मुंबई क्राइम ब्रांचने तब्बल 25 लाख मास्क जप्त केले असून बाजारपेठेत याची किंमत 14 कोटी इतकी आहे. हे मास्क काळ्याबाजारात विकण्याचा आरोपींचा हेतू होता. गृहमंत्री अनिल देशमुख, आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाबद्दल खुलासा करणार आहे.