Coronavirus : भारतात ‘कोरोना’चे आतापर्यंत 1039 रुग्ण, 27 जणांचा मृत्यु

पोलीसनामा ऑनलाइन – देशातील विविध राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. मागील  24 तासात कोरोनामुळे देशात सहा जणांना जीव गमावावा लागला आहे. तर 106 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात एकूण 1 हजार 39 जणांना कोरोनाची लागण झाली  आहे.  तर महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 203 वर पोहोचला आहे.

देशात शनिवारीच कोरोनाग्रस्ताचा आकडा  एक हजार पार झालेला होता. केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. आत्तापर्यंत देशात 27 राज्यात कोरोना व्हायरस परला आहे. कोरोनामुळे देशात एकूण 27 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर 90 जण कोरोना होऊन देखील बरे झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केलं आहे.

मात्र, दिल्लीतील एका बसस्टँडवर काल शनिवारी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. बिहार, उत्तर प्रदेश मधून आलेले हजारो कामगार याठिकाणी घरी जाण्यासाठी आले होते. परिमाणी सोशल डिस्टन्सिंग कशी पाळली जाईल, असा प्रश्न विचारला जात आहे. महाराष्ट्र 6 गुजरात 5 कर्नाटक 5 मध्य प्रदेश 2 तामिळनाडू, बिहार, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश प्रत्येकी 1 जणांचा मृत्यू झाला आहे.

You might also like