Coronavirus : ‘या’ 8 शहरांमध्ये देशातील 56.5 % ‘कोरोना’बाधित, जाणून घ्या 4 महानगरांमधील परिस्थिती

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशात पसरत असलेल्या कोरोना व्हायरसने भारतातील बहुतेक सर्व राज्यांना आपल्या कचाट्यात अडकवले आहे. गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत माहितीनुसार, देशात मृतांची संख्या वाढून 1783 झाली आहे आणि संसर्ग होण्याच्या एकूण घटनांची संख्या 52952 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 35902 आहे आणि आतापर्यंत 15266 लोकांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातून सर्वाधिक प्रकरणे समोर येत आहेत. येथे संक्रमणाचा आकडा 10 हजारांच्या पुढे गेला आहे.

या 8 शहरांत देशातील 56.5 टक्के कोरोना प्रकरणे

देशातील 20 % प्रकरणे मुंबई महानगरात
देशातील 20% प्रकरणे मुंबई शहरातून समोर येत असून येथे संक्रमित लोकांची संख्या 10 हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत 769 नवीन रुग्ण आढळले असून त्यानंतर संक्रमितांची संख्या 10,567 वर गेली आहे. मुंबईत एका दिवसात 25 जणांचा मृत्यू झाला, कोविड -19 ने मृत्यू झालेल्या लोकांची संख्या वाढून 412 झाली. आतापर्यंत 2287 लोक संसर्गाने बरे झाले आहेत. बुधवारी शहरात 443 कोरोना संशयितांची भरती करण्यात आली आहे.

दिल्लीत संसर्ग झालेल्यांची संख्या 5532
बुधवारी दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 428 नवीन प्रकरणांची नोंद झाली असून, कोविड -19 संक्रमितांची संख्या 5532 वर गेली आहे. एका दिवसात समोर येणारा हा सर्वाधिक आकडा आहे. दिल्ली सरकारने याबाबत माहिती दिली. राजधानीत तीन दिवसानंतर संक्रमित रूग्णाच्या मृत्यूची संख्या 65 वर पोहोचली.

चेन्नईमध्ये संक्रमित आकडे 2331 वर
चेन्नईमध्येही संसर्गामुळे वाईट स्थिती असून आतापर्यंत एकूण 2331 रुग्ण आढळले आहेत. चेन्नईतील एक भाजीपाला बाजार कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे, येथून सतत प्रकरणे समोर येत आहेत. जिथे चोवीस तास गर्दी असते. सीएमडीएच्या आकडेवारीनुसार, दररोज सुमारे 15,000 लोक या बाजारात भेट देतात.

कोलकातामध्येही हीच परिस्थिती
पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये कोरोना संक्रमणाची एकूण 754 प्रकरणे आहेत. येथे आतापर्यंत 94 लोकांचा मृत्यू झाला असून त्यासह 136 लोक पूर्णपणे निरोगी होऊन घरी गेले आहेत. कोलकाता शहरात 524 सक्रिय प्रकरणे आहेत. तसेच देशातील एकूण प्रकरणांपैकी 9% (4716) अहमदाबाद, 4 % ( 2087 ) पुणे, मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये (1681) आणि 3-3 % महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून (1616) सामोरे आली आहेत.