Coronavirus : एकाच दिवशी आढळले 14 ‘कोरोना’बाधित, चौघांचं ‘मरकज कनेक्शन’, नागपूरची संख्या 41 वर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. राज्यात देखील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव विदर्भातील काही जिल्ह्यात वाढत असताना दिसून येत आहे. उपराजधानी नागपूरमध्ये एकाच दिवशी 14 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे नागपूरकरांची चिंता वाढली आहे. नागपूरमध्ये आता कोरोनाबाधितांची संख्या 41 वर जाऊन पोहचली आहे. दरम्यान, आज आढळून आलेल्या 14 बाधितांपैकी चौघांचं मरकज कनेक्शन समोर आले आहे.

नव्याने आढळून आलेल्या 14 पैकी चौघांनी दिल्ली येथील मरकजच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती असं सांगितलं जात आहे. प्रशासनाकडून त्या साखळीचा शोध घेण्यात येत आहे. इतर 8 जणांपैकी कोण-कोण कोणाला भेटलं याबाबत देखील तपास चालु आहे. आढळून आलेल्या 14 पैकी एकजण कामठी येथील रहिवासी आहे तर चौघे जबलपूर येथील आहेत. तिघे काटोल मार्गावरील तर सर्वरित काही जण सतरंजीपुरा येथील रहिवासी आहेत. 14 पैकी चौघे हे जबलपूर येथील रहिवासी असून ते दिल्ली येथील जमातच्या कार्यक्रमाला गेले होते असा दावा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. संशयावरून 14 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आणि त्यांचे घशातील द्रवाचे नमुने घेतले गेले. त्यांचे रिपोर्ट आले असून ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्या 14 जणांच्या सहवासात कोणी आलेले आहे काय याची माहिती घेतली जात आहे.