लवकर पराभूत होणार कोरोना ! जगभरात केवळ 0.4 % गंभीर प्रकरणे, 8 कोटीपेक्षा जास्त झाले बरे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस महामारी सुरू होऊन आता एक वर्ष उलटले आहे. मात्र, दिर्घकाळानंतर व्हॅक्सीन तयार झाल्याने एक आशा दिसू लागली. या दरम्यान, एक चांगली बातमी सुद्धा समोर आली आहे. जगात सध्या कोविड-19 ची 2 कोटी 54 लाख 25 हजार 757 अ‍ॅक्टिव्ह प्रकरणे आहेत. यापैकी गंभीर आजारी रूग्णांची संख्या केवळ 99 हजार 300 म्हणजे 0.4 टक्केच आहे.

संपूर्ण जगात आतापर्यंत कोविड-19 चे 10 कोटी 88 लाख 7 हजार 733 रूग्ण सापडले आहेत. यापैकी 23 लाख 95 हजार 906 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका कोरोना व्हायरस महामारीने प्रभावित जगातील सर्वात मोठा देश आहे. येथे आतापर्यंत 2 कोटी 81 लाख 6 हजार 704 रूग्ण सापडले आहेत. ज्यापैकी 4 लाख 92 हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे.

प्रभावित देशांमध्ये भारताचे स्थान दुसरे आहे. येथे आतापर्यंत सापडलेल्या 1 कोटी 8 लाख 92 हजार 550 रूग्णांपैकी 1 लाख 55 हजार 588 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांची संख्या 95 लाख 73 हजार 871 आहे. तर, भारतात हा आकडा 1 लाख 38 हजार 253 वर आहे. भारतात कोविड-19 च्या गंभीर प्रकरणांची संख्या 8 हजार 944 आहे. अमेरिकेनंतर महामारी दरम्यान ब्राझीलमध्ये सर्वात जास्त लोकांना जीव गमावला आहे. येथे मृतांचा आकडा 2 लाख 37 हजार 601 वर पोहचला आहे.

व्हॅक्सीनबाबत आली चांगली बातमी
या आकड्यांच्या दरम्यान चांगली बातमी ही आहे की, आतापर्यंत 8 कोटी 9 लाख 86 हजार 70 लोक बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, व्हॅक्सीन प्रोग्राम सुरू झाल्यानंतर जग महामारीविरूद्ध युद्ध जिंकण्याकडे निघाले आहे. द न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, जगात आतापर्यंत सुमारे 15.71 कोटी लोकांना व्हॅक्सीन देण्यात आली आहे. तर, भारत या बाबतीत पुढे जात आहे. येथे आतापर्यंत 75 लाखांपेक्षा जास्त लोकांना व्हॅक्सीन देण्यात आली आहे. मात्र, चीन, अमेरिका, ब्रिटनमध्ये व्हॅक्सीन डोसचा आकडा एक कोटीच्या पुढे पोहचला आहे.