‘कोरोना’मुळे जगभरात 4 लाखांपेक्षा आधिक मृत्यू !

पोलिसनामा ऑनलाईन – जगभरात कोरोना व्हायरसचा विळखा दिवसागणिक आणखी घट्ट होत आहे. आतापर्यंत 69 लाख 73 हजार 247 जणांना व्हायरसने ग्रासले आहे. 213 देशात व्हायरस या महामारीने चार लाख दोन हजार 69 जणांचे बळी घेतले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 34 लाख 11 हजार 98 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत आहेत. 19 लाख 88 हजार अमेरिकेतील नागरिकांना कोरोना व्हायरसने ग्रासले आहे. तर एक लाख 12 हजार जणांचा बळी घेतला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या यादीत अमेरिका जगात अव्वल स्थानावर आहे. भारतातील एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 46 हजार 622 इतकी झाली आहे.

इटलीमधील रुग्णसंख्या 2 लाख 34 हजार 810 आहे. युरोपातील देशांपैकी इटली आणि स्पेन हे देश सर्वाधिक प्रभावित झाले होते. या क्रमवारीत आठवडयाभरापूर्वी भारत नवव्या स्थानावर होता. कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनच्या रुग्णसंख्येपेक्षाही भारतातील रुग्णसंख्या अधिक आहे. दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या ब्राझीलमध्ये सहा लाख 75 हजार कोरोनाबाधित आहेत. तर तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या रशियामध्ये चार लाख 58 हजार करोनाबाधित आहेत. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या दोन लाख 88 हजार तर यूकेमध्ये दोन लाख 84 हजार कोरोनाबाधित रूग्ण आहेत.