Coronavirus Lockdown : लष्कराबाबत ‘ती’ अफवा पसरवणारा तरूण ‘गोत्यात’

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून सर्वच राज्यांच्या सीमा या बंद करण्यात आल्या आहे. अशा परिस्थितीत काही माथेफिरू अफवा पसरवित आहेत. मुंबईतील पठाणवाडीमध्ये सोशल मीडियावर ’लष्कर दाखल झाले आहे’ अशी अफवा पसरवणार्‍या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. सोहील सलीम पंजाबी नावाच्या तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

देशभरातील कोरोना व्हायरस रोखण्यासाठी डॉक्टर्स आणि पोलीस यंत्रणा जीव धोक्यात घालून कर्तृत्व पार पाडत आहे. परंतु, अपुर्‍या माहितीच्या आधारे काही जण अफवा पसरवण्याचे काम करीत आहे. मुंबईतील पठाणवाडी परिसरातील तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित तरुणाने व्हॉट्सअ‍ॅपवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये पोलिसांची जागा आता लष्कराने घेतली आहे. नळ बाजार,भिंडी बाजार, डोंगरी, मदनपुरा, काला पानी आणि सात रास्ता परिसरात परिस्थितीत हाताबाहेर गेली असून लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. लोकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज आणि गोळीबार करण्यात आला, असेही या तरुणाने व्हिडिओमध्ये नमूद केले होत. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अशी कोणतीही परिस्थितीत या परिसरात निर्माण झाली नव्हती.