दुर्देवी ! ‘लॉकडाऊन’ दरम्यान गावी जाण्याचा प्रयत्न, इंडिका कारच्या अपघातात मायलेकांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाईन टीम – भरधाव वेगातील मोटारीचा अचानक टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत. येवल्याजवळ नाशिक-औरंगाबाद मार्गावर ही घटना घडली.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. लोकांनी घरातून बाहेर पडू नये अशी वारंवार विनंती आणि सूचना केली जात आहे. परंतु,तरीही लोक बाहेर पडत आहे. येवल्यात मोटारीतून गावी चाललेल्या एका कारला झालेल्या अपघातात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 3 जण गंभीर जखमी आहे. टाटा इंडिका कारमधून 5 जण हे जात होते. अचानक टायर फुटल्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पुलावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. दुर्दैवाने या अपघातात आई आणि मुलाचा समावेश आहे. तर या कारमधील इतर 3 जण जखमी झाले आहे. जखमींना येवल्याच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like