5 एप्रिल 9 वाजता ! जितेंद्र आव्हाडांनी केलं राज्यातील जनतेला ‘हे’ आवाहन, म्हणाले…

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  देशात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहे. त्यासाठी देशपातळीवर लढा देण्यासाठी सरकारकडून खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी घरात दिवे लावण्याचे आवाहन केलं आहे. त्यांच्या या आवाहनाला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सडकून टीका केली होती.

पंतप्रधान म्हणाले होते की ‘येत्या पाच तारखेला रात्री ९ वाजता घरातील लाईट घालवा आणि मेणबत्ती व दिवे लावा’ मात्र आमचं मत वेगळं असून, लाईट घालवून दिवे लावण्यापेक्षा उलट त्याक्षणी घरातील, दारातील, गॅलरी व बाल्कनीतल्या, गच्चीतल्या आणि सोसायटीच्या सगळ्या लाईट्स लावा, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

‘लक्षात ठेवा. अंधारात कधीही चांगली काम होत नाहीत. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. तेव्हा अंधार करू नका. अंधारात पाप करायची संधी देऊ नका. दान हे पुण्य आहे. ते उजेडात करा. असं म्हणत त्यांनी मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवली.

तसेच, जे लाखो डॉक्टर्स, नर्स, वोर्डबॉय, पोलीस, सफाई कर्मचारी, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, हे सगळीकडे काम करणारे लोक आहे. त्यांच्या समर्थनासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये फक्त १०१ रुपये द्या आणि त्याचे फोटो आपल्या व्हॉट्सॲप, फेसुबक वर अभिमानाने ठेवा. अशी विनंती त्यांनी राज्यातील जनतेला केली.

प्रत्येक गोष्टीत इव्हेंट का करायचा.

दरम्यान, कालही आव्हाड यांनी मोदींच्या आवाहनावर टीका केली होती. ‘देशातील नागरिकांना आशा होती की ते आधार देतील, कुठलाही नागरिक उपाशी झोपणार नाही याबाबदल बोलतील मात्र मोदींना प्रत्येक गोष्टींचा इव्हेंट का करावासा वाटतो? असा सवाल करत त्यांनी टीका केली.