Coronavirus : ‘कोरोना’ला संपवण्यासाठी रोहित पवारांनी सुचवली नवी ‘आयडिया’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यावर कोरोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कोरोना विषाणूविरोधात लढा देण्यासाठी राज्य सरकारने युद्ध पातळीवर काम सुरु केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार यांनीही या लढाईत पुढाकार घेत नागरिकांना आवाहन केले आहे. रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करून नागरिकांना आवाहन केले आहे.

आपल्या प्रत्येकाला देशावर नितांत प्रेम आहे. पण आज देशापुढे कोरोना व्हायरसचं महासंकट उभं ठाकलं आहे. यातून देशाला बाहेर काढण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहे आणि आपण करत आहोत. यात वैद्यकीय सेवा, पोलीस, वैज्ञानिक यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर आपला डीपी हा राष्ट्रध्वज ठेवण्याचं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, आज राज्यात नवीन तीन रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात दोन आणि बुलढाण्यात एक कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाची संख्या 338 वर पोहचली आहे. काल (बुधवारी) ही संख्या 335 वर पोहचली होती. पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना पुण्यात कोरोनाचे आणखी दोन नवे रुग्ण आढळले आहेत. बुलढाण्यात एक रुग्ण आढळून आल्याने बुलढाण्यात कोरोना रुग्णांची संख्या 5 वर पोहचली आहे.