COVID-19 : ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेमुळं ‘कोरोना’ व्हायरसनं मृत्यू होण्याचा धोका अधिक ? रीसर्चमधील नवीन माहिती

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यादरम्यान व्हिटॅमिन डी ची कमतरता आणि वाढणाऱ्या करोना रुग्णांची संख्या यातील परस्पर संबंध शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे. शास्त्रज्ञांनी व्हिटॅमिन डी आणि कोरोना व्हायरसचा परस्पर काही संबंध आहे का ? यावर अभ्यास करण्यात आला. शास्त्रज्ञांना संशोधनादरम्यान व्हिटॅमिन डीची कमतरता आणि श्वसनाशी संबंधित संसर्गामध्ये संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

जाणकारांच्या माहितीनुसार, व्हिटॅमिन डी पांढऱ्या रक्त पेशींच्या कार्यप्रणालीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. जीवनसत्त्व ड शरीरामध्ये सायटोकिन्स नावाच्या पेशी वाढवण्यापासून रोखण्याचे काम करतात. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णामध्ये याच पेशींची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे. ली स्मिम यांच्या माहितीनुसार, युरोपियन देशांमध्ये मृत्यू झालेल्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आणि कोरोना एकमेकांशी संबंधित असल्याचे आढळून आलंय.

काय आहे संबंध ?

व्हटॅमिन डीमुळे आपला श्वसनाशी संबंधित संसर्गापासून बचाव होतो, अशा माहिती संशोधनातून पुढे आली आहे. सोबतच ज्या वयोवृद्ध नागरिकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळून येत आहे, अशा व्यक्ती कोरोनामुळे अधिक प्रभावित झाल्या आहेत. स्मिथ यांच्या माहितीनुसार हॉस्पिटल आणि आरोग्य केंद्रात आढळलेल्या 75 टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची पातळी खूपच कमी असल्याची माहिती सुरुवातीच्या अभ्यासात आढळून आली होती. पण संबंधित माहिती पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याचंही संशोधकांनी म्हटलं होतं.

व्हिटॅमिन डी युक्त आहार

व्हिटॅमिन डी मिळवण्याचे उत्तम स्त्रोत म्हणजे मासे हे आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या माशांमध्ये व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात असते. सॅल्मन आणि टुना फिशमध्ये याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे कित्येक आजारापासून आपलं संरक्षण होतं. त्याचप्रमाणे अंड्यामध्ये देखील कित्येक प्रकारच्या व्हिटॅमिन आणि प्रोटीनचा समावेश असतो. नाश्त्यामध्ये अंड्याचा समावेश केल्यास आरोग्यास फायदेशीर ठरते. नियमित एक अंडे खाल्ल्यास शरीरास 7 टक्के व्हिटॅमिन डीचा पुरवठा होतो. अंड्याच्या पांढऱ्या भागात व्हिटॅमिन ए,ई, के आणि झिंक असते.

नियमित दूध पिल्याने मिळते व्हिटॅमिन डी

आयुर्वेदानुसार दुधाला संपूर्ण आहाराचा दर्जा देण्यात आलेला आहे. दुधामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी असते. नियमित दूध पिल्यास शरीराला 21 टक्के व्हिटॅमिन डी मिळते. याशिवाय मशरुम देखील शरीराला चांगले असते. व्हिटॅमिन डी शाकाहारी आणि व्हेज डायट फॉलो करणाऱ्यांमध्ये भरपूर प्रमाणात आढळते. यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता कमी असते. हे धोके टाळण्यासाठी सोया दूध प्यावे. यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता भरून निघण्यास मदत होते.

व्हिटॅमिन डी कमतरतेमुळे होणारे आजार

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडांचे विकार, स्नायू कमकुवत होणे, स्नायूंचे दुखणे, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, पक्षघात, आतड्यांचे विकार, कर्करोग यासारख्या आजारांचा धोका अधिक असतो. त्याचप्रमाणे, डिप्रेशन, ऑस्टिओमलेशिया, ऑस्टिओपोरोसिस (हाडे ठिसूळ होणे), क्षयरोग, जंतूसंसर्ग, ऑटो इम्यून डिसॉर्डर इत्यादी आजार-विकारांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळून येण्याची शक्यता असते. शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
लक्षणं

मन उदास राहणे, चिडचिड होणे, अचानक वजन वाढणं, वारंवार आजारांचा संसर्ग होणं, शरीरावरील जखमा न भूरन येणं, प्रचंड थकवा येणे, पचन प्रक्रियेत अडथळा निर्माण होणे

आरोग्याची काळजी कशी घ्याल

कॅल्शिअमयुक्त आहार एकाच वेळेस घेऊ नका.धूम्रपान, मद्यपान, लोणचे, मीठ, कॅफिन, शीतपेय इत्यादींमुळे शरीरातील कॅल्शिअम कमी होते. त्यामुळे या गोष्टी टाळा. शरीरात कॅल्शिअमची कमतरता असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.

कॅल्शिअम घेताना शरीरातील व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणात आहे की नाही याची खात्री करा. आणि त्यानुसार व्हिटॅमिन डीयुक्त आहार किंवा औधोपचार घेणेही गरजेचे असते. कोवळे ऊन अंगावर घेणे. दुपारच्या कडक उन्हात जाणे टाळा, अन्यथा त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते.