अखेर ‘कोरोना’विरुद्ध लढण्यासाठी शाहरूख खान करणार मदत, ट्विटरवरून दिली माहिती

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महामारीविरुद्ध लढण्यासाठी देशभरातील अभिनेते, कलाकार, खेळाडू धावले आले होते. मात्र, शाहरुख खानने मदत केली नसल्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली होती. अखेर बॉलिवूडचा किंग खानही मदतीसाठी पुढे सरसावला आहे. कोरोना व्हायरसने देशात हैदोस घातला आहे. अशातच कोरोना विरूद्ध लढा देण्यासाठी संपूर्ण जग पुढे सरसावला आहे. अनेक उद्योजक, सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. अशातच बॉलिवूडचा किंग खानही कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आला आहे. त्याने आपली कंपनी रेड चिलीज एन्टरटेन्मेंट, रेड चीलीज वीएफएक्स, आयपीएल क्रिकेट टीम कोलकत्ता नाइट रायडर्स आणि मीर फाऊंडेशनमार्फत मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. शाहरूख खान कशाप्रकारे आणि कुठे मदत करणार, याबाबतची माहिती रेड चिलीज एन्टरटेन्मेंटच्या ट्विटर हॅन्डलवर शेअर करण्यात आली आहे. याबाबत दोन पानांचे एक स्टेटमेंट जारी करण्यात आले आहे. ज्यामध्ये मदतीबाबत संपूर्म माहिती देण्यात आली आहे. या स्टेटमेंटनुसार, किंग खान आपल्या कंपन्यांमार्फत मुंबई, दिल्ली आणि कोलकत्ता या शहरांमध्ये मदत करणार आहे.

शाहरूख खानने रेड चिलीज एन्टरटेन्मेंटचं ट्वीट रिट्वीट केले आहे. त्यामध्ये ’सध्याच्या वेळी हे गरजेचे आहे की, ज्या व्यक्ती आपल्यासाठी मेहनत घेत आहेत, त्या तुमच्याशी निगडीत नाहीत, तुमच्यासाठी अनोळखीदेखील असतील, त्या लोकांना पटवून द्या ते एकटे नाहीत. आपण सर्व एकमेकांसाठी काहीतरी करू. भारत आणि सर्व भारतीय एक कुटुंब आहे. ’रात्रीनंतर एका नव्या दिवसाची सुरुवात होणार आहे, हा दिवस बदलणार नाही, तारिख मात्र नक्की बदलेल.’ याचसोबत शाहरूख खानने सर्वांसाठी आणि सर्वांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना केली आहे. तसेच त्याने लोकांना सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचं आवाहनदेखील केले आहे. कृपया काही दिवसांसाठी सोशल डिस्टंन्सिंग पाळा… थोडे लांब, आणखी लांब, आणखी लांब.’ असे ट्वीट केले आहे.