चक्क शासकीय वाहनात मित्रांना ‘बिर्याणी’ अन् ‘दारुपार्टी’, पोलीस कर्मचारी निलंबित, चौघांविरोधात FIR

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – लॉक डाऊनच्या काळात इतर पोलीस रात्रभर बंदोबस्त करीत होते. संचारबंदीमध्ये रस्त्यांवर शुकशुकाट होता. त्यावेळी सोलापूर पोलीस दलातील मोटार परिवहन विभागातील एक पोलीस कर्मचार्‍याने चक्क शासकीय वाहनातून आपल्या तीन मित्रांना शहरात फिरविले. इतके काय त्यांना या वाहनामध्येच बिर्याणी आणि दारुची पार्टीही दिली. आपण खुप मोठा तीर मारत असल्याच्या आविर्भावात त्यातील एकाने हे सर्व फेसबुक व लाईव्ह केले. त्याचे रस्त्यावर दारु पित असल्याचे व्हिडिओ अपलोड केले. त्यामुळे हा प्रकार समोर आला.

सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या पोलीस काँस्टेबलला तत्काळ निलंबित केले आहे. त्याच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विनोद सूर्यकांत दंतकाळे असे या पोलीस काँस्टेबलचे नाव आहे. तर, केतन कसबे, राहुल शिंदे, सुमेध वाघमारे अशी त्याच्या मित्रांची नावे आहेत. लॉक डाऊन असताना विनोद दंतकाळे हे जेल रोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या शासकीय वाहनांवर चालक म्हणून कार्यरत होते. ६ एप्रिल रोजी त्यांनी आपले मित्र केतन कसबे, राहुल शिंदे, सुमेध वाघमारे यांना शासकीय वाहनातूनच सोलापूर शहरात विविध भागात फिरविले.

त्यानंतर एका ठिकाणी थांबून त्यांनी त्या वाहनातच दारु आणि बिर्याणीची पार्टी केली. हा सर्व प्रकार केतन कसबे याने फेसबुकवर लाईव्ह केला. तेव्हा हा प्रकार समोर आला. केतनने काही वेळाने हा फेसबुकवरुन हा व्हिडिओ तात्काळ डिलिट केला आहे. मात्र त्याआधी त्याने रस्त्यावर फिरताना रिक्षामध्ये बिअर पितानाचा असाच एक व्हिडिओ प्रसारित केला होता.

हा प्रकार लक्षात आल्यावर शासकीय वाहनांचा गैरवापर करीत बेशिस्त वर्तणुक केल्याप्रकरणी विनोद दंतकाळे याला निलंबित करण्यात आले़ तर दंतकाळे याच्यासह त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like