Coronavirus : ‘क्वॉरन्टाईन’ रुग्णांची माहिती घरबसल्या मिळणार, ! मराठी उद्योजकानं बनवलं App

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनोमुळे अनेकांना होम क्वॉरन्टाईन करण्यात आले आहे. अशा होम क्वॉरन्टाईन लोकांची माहिती आता महानगरपालिकांना घरबसल्या मिळणार आहे.पनवेलमधील मराठी तरुण उद्योजक विकास औटे यांनी हे ’कोविगार्ड’ आणि ’कोविकेअर’ अशी दोन अ‍ॅप विकसित केली आहेत. याचा वापर सध्या काही महापालिका करत आहेत.

कोरोनामुळे ज्या नागरिकांनी त्यांच्या घरात क्वॉरन्टाईन केलेले आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी ’कोविगार्ड’ नावाचा एक खास मोबाईल अ‍ॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. आरोग्य विभागातील अधिकार्‍यांना घरबसल्या आता होम क्वॉरन्टाईन असलेल्या लोकांच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल माहिती मिळणार आहे. अशा लोकांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी आणि व्हायरससंदर्भात कोणत्याही प्रश्नांची उत्तरे घ्यायची असल्यास किंवा लोकांशी संपर्कात राहाण्यासाठी हे माध्यम ठरणार आहे. होम क्वॉरन्टाईन रूग्णांना हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल. त्या माध्यमातून महापालिकेचा आरोग्य विभाग त्या रुग्णांशी नियमित संपर्क साधणार आहे.

याचा वापर सध्या काही महापालिका करत आहेत. महानगरपालिकेद्वारे आरोग्य सेवा दिल्या जाणार्‍या भागात महापालिकेला मदत करण्यासाठी कोविकारे नावाचे आणखी एक अ‍ॅप तयार केले आहे. ते करण्यासाठी, अ‍ॅपची लिंक सोसायटी / सोसायटीच्या प्रतिनिधींना पाठवली जाईल. ज्याद्वारे त्यांच्या सोसायटीतील लोकांचा तपशील सबमिट करावा लागेल. कोविकेअर आणि कोविगार्डच्या मदतीने नागरिकांपर्यंत पोहोचणे सोपे आहे. याद्वारे नागरिकांना घराबाहेर पडू नये, असा संदेशही दिला जात आहे. वास्तविक या अ‍ॅपद्वारे माहिती शेअर केली जाऊ शकते म्हणून महानगरपालिका आवश्यक असल्यास त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकतील.