देशातील कोरोना बाधितांची संख्या २ लाख पार

कोरोनामुक्त रुग्णांनीचा आकडा १ लाखाहून अधिक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने २ लाखांचा आकडा पार केला असला तरी त्याचवेळी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही १ लाखांहून अधिक झाली आहे. गेल्या २४ तासात सर्वाधिक ८ हजार ८२१ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच २२१ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

 

देशातील कोरोना बाधितांची एकूण संख्या २ लाख ७ हजार १९१ इतकी झाली आहे. त्यापैकी १ लाख १ हजार ७७ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. गेल्या २४ तासात देशभरातील २२१ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. देशात आतापर्यंत ५ हजार ८२९ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

 

गेल्या २४ तासात देशभरातील विविध रुग्णालयातून ४ हजार ५३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्याबरोबरच देशात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख २८५ इतकी झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like