दिवे लावण्यापुर्वी ‘सॅनेटायझर’ लावाल तर….

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महामारीविरूद्ध लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आज रात्री नउ वाजता दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. मात्र, दिवे लावण्याआधी सॅनेटायझर वापराल तर तुम्हाला महागात पडू शकते. दिवे लावण्याआधी अल्कोहोल मिश्रित सॅनेटायझरचा वापर केल्यास ही चूक तुम्हाला महागात पडून आग लागू शकते. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

केंद्र सरकारने देशातील जनतेला सूचना दिला आहे. दिवे लावण्याआधी अल्कोहोल मिश्रित सॅनेटायझरचा वापर करू नका. अल्कोहोल हा ज्वलनशील पदार्थ आहे. दिवे लावताना त्याचे काही प्रमाण जर हातावर असेल तर ते पेटही घेऊ शकते. त्यामुळे हात भाजला जाण्याची शक्यता नाकारता येता नाही. यासंदर्भात लष्करानेही अशाच काही सूचना केल्या आहेत. दिवे लावण्याआधी सॅनेटायझर न वापरता हात स्वच्छ धुवून घेण्याचे सांगितले आहे. तसेच पीआयबचे मुख्य महासंचालक के. एस. धातवालिया यांनी रविवारी रात्री दिवे लावताना अल्कोहोलचा समावेश असणारे हँड सॅनेटायझर वापरू नका असे आवाहन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळेस त्यांनी लॉकडाउनच्या काळामध्ये भारतीय दाखवत असलेल्या संयमाचे कौतुक केले होते. देशातील सर्व 130 कोटी भारतीयांनी रात्री नऊ वाजता घरातील सर्व लाइट्स बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्यास सांगितले आहे. या माध्यमातून आपण कोरोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करु असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.