पूर्व हवेलीत ‘कोरोना’चा विळखा घट्ट, एकाच दिवसात 9 ‘कोरोना’बाधीत

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्व हवेलीत कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असून सोमवारी एकाच दिवशी नऊ रुग्ण आढळून आले यात अष्टविनायकापैकी एक असलेल्या थेऊरमध्ये पाच तर कुंजीरवाडीत दोन कोरेगाव मूळमध्ये एक आणि लोणी काळभोरच्या एकाचा समावेश आहे यामुळे या भागात मोठी घबराहट निर्माण झाली आहे.

लाॅकडाऊनच्या नियमात शिथिलता मिळाल्यानंतर नागरिकांनी कोणत्याही नियमाचे पालन करताना दिसत नाहीत याचा परिणाम जाणवू लागले आहेत दररोज कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढत असल्याचे दिसून आले काल सोमवारी तर उद्रेक झाला त्यामुळे निर्बंधाची आवश्यकता निर्माण झाली आहे. ही साखळी तोडायची असेल तर संपूर्ण लाॅकडाऊन करण्याची आवश्यकता आहे.आरोग्य विभागाने या संदर्भात कडक पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.गावात दवंडी देण्याची सूचना दिली होती परंतु त्याची अमलबजावणी झालेली नाही. तसेच गावात निर्जंतुकीकरण करण्याची आवश्यकता आहे.

थेऊरमध्ये पाच रुग्ण सापडल्याने गावात कडक निर्बंध घातले जावेत अशी नागरिकांची प्रतिक्रिया येत आहे कारण सापडलेल्या रुग्णांचा गेल्या काही दिवसात गावातील अनेकांशी संपर्क आलेला आहे त्यामुळे येत्या चार सहा दिवसात काय परिस्थिती निर्माण होते यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे सामाजिक प्रसार होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्याकरिता गावातील केवळ औषध दुकानाव्यतिरीक्त सगळे व्यवहार बंद ठेवण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच थेऊरफाटा येथील एका हाॅटेलमध्ये गेली अनेक महिने चालू असलेल्या पत्त्यांचा डावामधील दोघांना कोरोनाची लागण झाली त्यामुळे त्यातील इतर नऊ जणांना शोधून त्यांची चाचणी घेण्यात आली.त्यानंतर कुंजीरवाडी येथील काही क्षेत्र सिल करण्यात आले. सध्या थेऊरसह कुंजीरवाडी, लोणी काळभोर, कोरेगाव मूळ या गावातील नागरिकामध्ये भितीचे वातावरण आहे