Coronavirus : केरळमध्ये नवे 26 ‘कोरोना’बाधित

तिरुअनंतपुरम  : पोलीसनामा ऑनलाइन  –  केरळ राज्यात गुरुवारी नव्या 26 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 560 झाली आहे अशी माहिती केरळ सरकारने दिली आहे. केरळ या राज्याने काही वर्षांपूर्वी सार्स या महारोगाशी लढा देताना अशा संसर्गजन्य आजारांशी लढण्याची सरकारी यंत्रणा उभी केली होती. त्यामुळे राज्यातील नागरिकांना सूचना देऊन त्यांनी नियोजनबद्धपणे कोरोनाचा सामना केला होता.

नोव्हेबर 2019 मध्ये चीनमध्ये कोरोना विषाणूची चर्चा सुरू झाल्यापासूनच मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्या सरकारने सरकारी यंत्रणा कामाला लावली होती. केंद्र सरकारने लॉकडाउन जाहीर करण्यापूर्वीच केरळने राज्यात लॉकडाउन राबवला होता. तसेच परदेशातून आलेल्या प्रत्येक नागरिकाला 14 दिवस क्वारंटाइन केले होते. राज्य सरकारच्या प्रयत्नांना तेथील जनतेनेही तशीच साथ दिल्यामुळे तिथे कोरोनाविषाणूचा संसर्ग फार मोठ्या प्रमाणात झाला नाही.