Lockdown : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हयात लॉकडाऊन !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने आणि शहरातील कोरोनाच्या रूग्णांची पाहता सोमवार (दि.13 जुलै) पासून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हयात कडकडीत लॉकडाऊन जाहीर करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना सूचना दिल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्यापही त्याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही. यासंदर्भात पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप निर्णय झालेला नाही. लॉकडाऊनबाबत विभागीय आयुक्त यांच्याशी चर्चा केल्यानंतर आणि सर्वबाबींचा विचार करून लॉकडाऊनची नियमावली तयार केल्यानंतर तो जाहीर करण्यात येईल सांगितले आहे.

पुणे आणि पिंपरी शहरामध्ये कोरोना व्हायरसचे रूग्ण मोठया संख्येने वाढत आहेत. पुणे शहरात सलग 2 दिवस एक हजार पेक्षा अधिक रूग्ण आढळले आहेत. प्रशासनाने वेळावेळी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. मात्र, काही जण काही एक काम नसताना देखील रस्त्यावर फिरताना दिसत आहे. पुणे पोलिसांनी काल (गुरूवार) तब्बल 2000 जणांवर कारवाई केली आहे. दि. 13 जुलै पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला तर तो किती दिवसांचा आणि त्यामध्ये कोणत्या बाबींना सूट देण्यात येईल आदी सर्व गोष्टींची नियमावली तयार करण्यात येणार असून त्यावर लवरकच निर्णय होईल असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी विभागीय आयुक्तांशी चर्चा करून तो जाहीर करण्यात येईल असे सांगितले. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये कोणते व्यवसाय सुरू राहतील आणि नियमावली याबाबत लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.