थेऊर : ‘कोरोना’ संक्रमणाची साखळी तोडण्यात यश पण इतर गावांची स्थिती ‘गंभीर’

थेऊर : पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना विषाणूचा संसर्ग पूर्व हवेलीतील बहुतेक सर्व गावामध्ये दिवसेंदिवस वाढत असल्याने ही गंभीर बाब आहे ही संक्रमणाची साखळी लवकर तोडणे आवश्यक आहे अन्यथा मोठी समस्या निर्माण होईल .या भागातील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, शेवाळेवाडी, मांजरी बुद्रुक, थेऊर, उरुळी कांचन या गावात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.

या भागात गेल्या पंधरा दिवसांत कोरोनाची रुग्ण संख्या वाढत गेली.सध्या लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, शेवाळेवाडी, मांजरी बुद्रुक, उरुळी कांचन या गावात दररोज नवीन रुग्ण आढळून येत आहेत.या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची नियमीत तपासणी केली जात आहे त्यामुळे ही संख्या वाढत आहे.ही संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा युध्दपातळीवर प्रयत्न करत आहेत महसुली अधिकारी आरोग्य अधिकारी नियमित बैठका घेऊन वेगवेगळ्या उपाययोजना बाबत सूचना देतात.

अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेले थेऊर येथे मागच्या आठवड्यात अचानक कोरोनाचा शिरकाव झाला एकाच दिवसात सहा रुग्ण संक्रमीत झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी मेहबूब लुकडे, तसेच थेऊर येथील उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी डाॅ पुजा सूर्यवंशी, आरोग्य सेवक प्रशांत बिराजदार, सेविका भारती सोनवणे तसेच सर्व आशा सेविका व ग्रामपंचायत प्रशासन यांनी तत्परतेने सर्व हालचाली केल्या. यापैकी पाच जण कोरानावर मात करून काल बुधवारी घरी परतले आहेत तर एकजण उपचार घेत आहे त्यानंतर पुन्हा एकही रुग्ण आढळून आला नाही यावरुन संक्रमणाची साखळी तोडण्यात यश आले आहे.