नीरा : 7361 नागरिकांची आरोग्य तपासणी, 6 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळले

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुुुक्यातील नीरा येथील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरंदरच्या प्रशासनाकडून रविवारी (दि.१३) होम टू होम तपासणी सर्व्हे मोहिम राबविण्यात आली. यामध्ये ४५ झोनमधील ७ हजार ३६१ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून ४९ संशयित नागरिक आढळले. त्यापैकी ६ नागरिक पाँझिटिव्ह आढळल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, नीरा येथील काही भागात पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी सर्व्हेची पाहणी करून माहिती घेेतली.

नीरा (ता.पुरंदर) येथे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी रविवारी (दि.१३) होम टू होम आरोग्य तपासणी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत २ हजार ३७७ कुटूंबांतील ७ हजार ३६१ नागरिकांचा पुरंदरमधील सुमारे १०० प्राथमिक, माध्यमिक शिक्षक,आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या टीमने होम टू होम तपासणी सर्व्हे केला. यावेळी नागरिकांची थर्मंल स्कँनरने तापमाण व आँक्सिमीटरने रक्तातील आँक्सिजनचे प्रमाण व पल्स रेट तपासणी करण्यात आली. तसेच प्रत्येक नागरिकांकडून १६ प्रश्नांची माहिती घेण्यात आली.

नीरा येथील सर्व्हेमधून ९५ टक्क्यांपेक्षा कमी रक्तातील आँक्सिजन व इतर लक्षणे असणारे ४९ संशयित नागरिक आढळले. या नागरिकांची नीरा येथील रयत संकुलात तयार करण्यात आलेल्या तपासणी सेंटरमध्ये डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर संबंधित नागरिकांची अँटिजेन स्वँब टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये ६ नागरिक कोरोना पाँझिटिव्ह आढळल्याची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली.

नीरा येथील तपासणी सर्व्हेची व सेंटरची पाहणी पुरंदर – दौंडचे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत, जेजुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी केली. या मोहिमेस मंडलाधिकारी संदीप चव्हाण, नीरेचे प्रशासक एन. डी. गायकवाड, ग्रामसेवक मनोज डेरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी घाडगे, पोलिस पाटील राजेंद्र भास्कर, कोतवाल आप्पा लकडे, रविंद्र जाधव, आरोग्यसेवक गणेश जाधव, आरोग्य सहाय्यक शिवाजी चव्हाण यांच्यासह ग्रामपंंचायत, तालुक्यातील आरोग्य कर्मचारी व प्रशासनातील अनेक कर्मचा-यांनी तपासणी मोहिमेतील टीमला सहकार्य केले.

पुरंदरच्या तहसीलदारांचे नागरिकांनी केले कौतुक…
नीरा येथील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रविवारी (दि. १३) दिवसभर राबविण्यात आलेल्या मोहिमेत पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी नीरा वार्ड नं. १ मधील वाँटर सप्लाय परिसरातील व वार्ड नं.४ मधील भागास प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करणा-या टीमकडून माहिती घेतली. तसेच नीरा येथील मोठया आरोग्य मोहिमेत लक्ष केंद्रीत करून मोहिम यशस्वी केल्याबद्दल नीरेतील नागरिकांनी तहसीलदार रूपाली सरनोबत यांचे कौतुक केले.