‘कोरोना’ग्रस्तांवर ’हे’ औषध ठरणार ‘प्रभावी’ ?, संशोधकांनी केला दावा

वॉशिंग्टन, दि. 15 ऑगस्ट : संशोधकांनी आता कोरोनाग्रस्तांवर ‘एबलसेलेन’ हे औषध प्रभावी ठरणार आहे, असे संशोधनातून सांगत आहेत.

आधुनिक कॉम्प्युटर सिमुलेशनद्वारे शास्त्रज्ञांनी करोनाच्या आजारावर प्रभावी ठरणार्‍या आणखी या औषधाचा शोध लावलाय. या औषधाचा वापर बायपोलर डिसऑर्डर आणि ऐकण्याची क्षमता कमी असणार्‍या रुग्णांसाठी केला जातो. हे औषध करोना विषाणूची प्रतिकृती बनवण्यापासून रोखत आहे, असे शास्त्रज्ञांना आढळले आहे. रुग्णाच्या शरीरात विषाणू आपली संख्या वाढवत नेतं आणि त्याचा परिणाम श्वसन क्षमतेवर होतो.

’जर्नल सायन्स अ‍ॅडव्हासेस’ मध्ये प्रकाशित केलेल्या एका संशोधनानुसार, करोना विषाणूचा मुख्य प्रोटीज ‘एमपीआयओ’ हा अंझाइम व्हायरसच्या लाइफ सायकलमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतोय. अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठातील संशोधकांसह इतर संशोधकांनुसार, ‘एमपीआयओ’ व्हायरसला जेनेटिक मटेरियलपासून प्रोटीन बनवण्याची क्षमता प्रदान करतो. त्यामुळे व्हायरस मानवाच्या शरीरात आपली संख्या वाढवतो.

बायोलॉजिकल मोलिक्युल्सच्या मॉडेलिंग तंत्रज्ञानाचा वापर करत शास्त्रज्ञांनी करोना विषाणूविरोधात संभाव्य प्रभावी हजारो कंपाउंड्सचा शोध घेतला जात आहे. ‘एमपीआयओ’ विरोधात प्रभावीपणे ‘एबलसेलेन’ हे औषध अधिक प्रभावी ठरेल, असे संशोधनातून शास्त्रज्ञांना आढळले आहे. यात एका केमिकल कंपाऊडमध्ये अ‍ॅण्टी व्हायरल, अ‍ॅण्टी इन्फ्लामेट्री, अ‍ॅण्टी ऑक्सिडेटिव्ह, बॅक्ट्रीसिडल आणि सेल प्रोटेटिव्ह क्षमता आहे.

संशोधनामध्ये डे पबलो आणि त्यांच्या सहकार्‍यांनी एन्झाइम आणि औषधाचे विस्तृत मॉडेल्स बनवणे आणि सुपर कॉम्प्युटर सिम्युलेशनमध्ये त्यांना असे आढळले की, ‘एबलसेलेन’ हे औषध ‘एमपीआयओ’अटकाव करू शकते. यामुळे करोनाग्रस्तांवर उपचार करता येणे शक्य होणार आहे, असा दावा केला जात आहे. मात्र, त्यादृष्टीने अधिक संशोधनाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

करोनावर उपचार करण्याच्या दृष्टीने शास्त्रज्ञांना मोठे महत्त्वाचे यश मिळालंय. ’कोव्हिड-19’वर उपचार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी शंभराहून अधिक संभाव्य औषधे शोधून काढलीत. ’मशिन लर्निंग’चा वापर करून ही औषधे शोधली असून करोनावर ती प्रभावी ठरतील, असा दावा देखील शास्त्रज्ञांनी केलाय. या शास्त्रज्ञांच्या या पथकामध्ये एका भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचा देखील समावेश आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक आनंदशंकर रे यांनी सांगितले, आम्ही एका औषधाची निर्मिती केलीय. ’ड्रग डिस्कव्हरी पाइपलाइन’ असा शब्दप्रयोग त्यांनी यासाठी वापरलाय. कम्प्युटरच्या साह्याने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून ही औषधं शोधलीत. जर्नल हेलियोन यात हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे.