Coronavirus : काळजी घ्या ! आणखी एक ‘कोरोना’ संसर्ग फोफावण्याची भीती ?

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था –    कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. संपूर्ण जग गेल्या 10 महिन्यांपासून हतबल झालं आहे. त्यातच आता ब्रिटन, फ्रान्स सारख्या युरोपीयन देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाच्या एकाच संसर्गातून सुटका होत नसताना देशात कोरोनाचा दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. डुकरांमध्ये फैलावणारा कोरोना विषाणु फैलावण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या कोरोनाची बाधा डुकरांपासून माणसांनाही होत असल्यानं अधिक धोका निर्माण झाला आहे.

संशोधनानुसार कोरोना विषाणुच्या या स्ट्रेनला स्वाईन एक्युट डायरिया सिंड्रोम कोरोना (एसएडीएस-सीओवी) म्हणून ओळखलं जातं. हा कोरोना विषाणू वटवाघळांमधून आला आणि त्याची माहिती 2016 मध्ये समोर आली होती. चीनमधील अनेक डुकरांना याची बाधा झाली होती.

या संशोधनात अमेरिकेतील चॅपल येथील नॉर्थ कॅरिलोना विद्यापीठाच्या संशोधकांनी या संशोधनात सहभाग घेतला होता. या संशोधनानुसार हा विषाणु मानवाचे फुप्फुस आणि आतड्यांच्या पेशीत वाढू शकतो. हा विषाणू बिटाकोरोना विषाणू एसएआरएस सीओवी 2 भाग आहे. त्यामुळं मानवाला श्वसन संबंधी आजार कोविड 19 ची बाधा होऊ शकते. एसएडीएस – सीओवी हा एक अल्फाकोरोना विषाणू आहे. जो डुकरांच्या पोटात आणि आतड्यांमध्ये आजाराचं कारण ठरतो. शास्त्रज्ञांनी सांगितलं की, या विषाणुमुळं जुलाब आणि उलटी होते.

पीएनडीएस सीओवीच्या संभाव्य धोक्याचं आकलन करण्यासाठी प्रयोगशाळेत परीक्षण केलं होतं. त्यानंतर हा विषाणू मनुष्याचं यकृत आणि आतड्यांच्या पेशींमध्ये वेगानं वाढू शकतं. डुकराचं मांस खाणाऱ्या देशांमध्ये हा संसर्ग फैलावण्याचा धोका असल्याचं बोललं जात आहे.