‘कोरोना’ग्रस्त कोलवडीची जबाबदारी एका आरोग्य सेवकावर

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना संसर्गाच्या कचाट्यात सापडलेल्या कोलवडी गावची संपूर्ण जबाबदारी केवळ एक आरोग्य सेवक व दोन आशा सेविकावर सोडून आरोग्य विभाग निश्चिंत असल्याचे चित्र आहे परिणामी येथील परिस्थिती अतिशय गंभीर असून सध्या या गावात जवळपास 42 रुग्ण आढळून आले आहेत. यातील केवळ 12 जण उपचार घेऊन घरी परतले आहेत तर काही हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत काहींना घरीच होम काॅरंटाईन करुन उपचार दिले जात आहेत.

कोलवडी ता. हवेली हे पूर्व हवेलीतील मध्यम लोकवस्तीचे गाव येथे गावठाणासह वाड्यावस्त्या मोठ्या प्रमाणावर आहेत लोकसंख्या विखुरलेली असल्याने कोणताही संसर्गाचा प्रभाग सहसा लवकर जाणवत नाही. कोरोनाच्या बाबतीत देखील हीच परिस्थिती होती जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यापर्यंत एकही कोरोना रुग्ण नव्हता परंतु गेल्या दोन आठवड्यात अचानक रुग्ण सापडत गेले सध्या या गावात 42 रुग्ण आढळले आहेत.एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असताना मात्र आरोग्य खात्याचा भोंगळ कारभार समोर आला आहे या गावाची सर्व जबाबदारी केवळ पठाण हे आरोग्य सेवक आणि दोन आशा सेविका सांभाळत आहेत.हे गाव वाघोली आरोग्य केंद्राचे अंतर्गत येत असून या आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डाॅ वर्षा गायकवाड तसेच कम्युनीटी हेल्थ ऑफिसर शेट्ये आणि आरोग्य सेविका मिना ख्रिस्ती या गावाकडे फिरकल्याच नाहीत अशी धक्कादायक परिस्थिती आहे एका बाजूला शासन कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे त्याचवेळी कोरोनाचा कहर असलेल्या कोलवडीत मात्र केवळ आरोग्य सेवक आणि दोन आशा सेविका गावाची जबाबदारी उचलत आहेत.

या गावातील धक्कादायक बाब म्हणजे लाॅकडाऊनच्या काळात येथील ग्रामविकास अधिकारी गावाकडे फिरकलेच नाहीत त्यामुळे गावातील उपाययोजना करण्यासंदर्भात काहीच निर्णय घेता आले नाही. गावचे माजी उपसरपंच संजय रिकामे यांनी याविषयी सांगितले की गेल्या तीन साडे तीन महिन्याच्या कालावधीत ग्रामसेवक कोलवडीत आलेच नाहीत त्यामुळे आम्ही याविषयीची तक्रार गटविकास अधिकारी शिर्के यांच्याकडे केली आहे.