घरात, बंगल्यात इंटरनेटला हवा तेवढा ‘स्पीड’ नाही मिळत ? ‘हा’ उपाय नक्की करून पाहा, जाणून घ्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक जण घरबसल्या ऑनलाईन काम करत असून याची संख्या देखील वाढली आहे. घराघरात मोबाईलचे मोबाईल इंटरनेटचे युजर्स वाढले आहेत. त्यामुळे इंटरनेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

वर्क फ्रॉम होम करत असताना अनेक वेळा इंटरनेटला स्पीड मिळत नाही. घराबाहेर आल्यानंतर इंटरनेटला स्पीड मिळतो. घरात इंटरनेटचा स्पीड कमी मिळत असल्याने एक 15 ते 20 केबीची फाईल देखील डाऊनलोड होत नाही. अशा वेळी ऑनलाईनच्या माध्यमातून काम करणाऱ्या व्यक्तींची महत्त्वाची कामे खोळंबून राहतात.

घरात मोबाइलला इंटरनेट स्पीड मिळण्यासाठी नेटवर्क बूस्टर मिळतात. या इंटरनेट बूस्टरचा वापर करून आपण घरात ऑनलाईनची सर्व कामे सहज करू शकता. बाजारात अनेक प्रकारचे नेटवर्क बूस्टर मिळतात. या नेटवर्क बूस्टरमध्ये तीन महत्त्वाचे भाग आहेत. हे युनिट साधारण एक छोट्या बॉक्ससारखे असते. ते घराच्या छतावर लावावे लागते. त्यानंतर हे एम्प्लिफायर युनिट आपल्या परिसरातील मोबाईल टॉवरवरून सिग्नल रिसिव्ह करते. या एम्प्लिफायरची एक केबल घरातील मुख्य युनिट म्हणजे इंडोअर युनिटला जोडलेली असते.

आऊडोअर युनिटकडून आलेले सिग्नल इंडोअर युनिटला काही पटीने पाठवले जातात. इंडोअर युनिट आऊटडोर युनिटकडून आलेले सिग्नल संपूर्ण घरात पसरवते. त्यामुळे आपल्याला घरात कोठेही बसून सजपणे काम करता येते. शिवाय इटरनेटचा स्पीड देखील जास्त मिळतो. हे युनिट वायफईसारखे असते. याचे वेगवेगळे प्रकार असतात जसे एअरटेल, आयडीया, जीओ, बीएसएनएल अशा वेगवेगळ्या नेटवर्क कंपनीला सपोर्ट करणारे युनिट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. याच्या किंमती नेटवर्क कंपनीनुसार असतात. मात्र 15 हजार रुपयांचे युनिट सर्व कंपन्यांना सपोर्ट करते.

नेटवर्क मिळवण्यासाठी या युनिटचा प्रॉपर सेटअप करावा लागतो. अनेक मोठमोठ्या ऑफिसेसमध्ये, बिल्डींगमध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम येत असतो. अशा ठिकाणी या बूस्टर्सचा वापर केला तर इंटरनेट स्पीडचा प्रॉब्लेम रहात नाही. बाजारात 500 ते 1000 रुपयांचे बूस्टर विकत मिळतात. मात्र हे बूस्टर्स काही कामाचे नसतात. तसेच 12 हजाराच्या मोबाइलसाठी 15 हजार रुपयाचा बूस्टर्स घेणे परवडणारे नाही. हे बूस्टर्स अशा लोकांना परवडतात ज्यांचे काम इंटरनेटवर ऑनलाईन चालते.

इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी हे करून पहा

– महत्त्वाचे किंवा गरजेचे अॅप्स फोनमध्ये ठेवा.
– सोशल मिडियाच्या माध्यमातून नको असलेले फोटो, व्हिडीओ, फाईल डिलीट करा.
– मोबाईलमधील कॅचेस फाईल डिलिट करा.
– आवश्यकता असेल तेव्हाच इंटरनेट सुरु करा अन्यथा बंद ठेवा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like