Coronavirus : वुहानच्या ‘त्या’ संशयास्पद लॅबबद्दल मोठा खुलासा, समोर आलं अमेरिकी ‘कनेक्शन’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूचा प्रसार सर्वात आधी चीनच्या वुहान शहरातून झाला. नंतर चीनने दावा केला की, तो वन्य प्राण्यांच्या बाजारातून मनुष्यामध्ये पसरला. त्यांनतर हा व्हायरस वटवाघुळातून पसरल्याचे आढळले. त्यांनतर पुन्हा चीनमधील एका लॅबवर गंभीर प्रश्न निर्माण झाले. कारण ही प्रयोगशाळा वुहान वन्य प्राण्यांच्या बाजारपेठेपासून अवघ्या काही अंतरावर आहे. ही प्रयोगशाळा अशा व्हायरसवर संशोधन करणारी चीनमधील सर्वात मोठी लॅब आहे. आता या संशयास्पद लॅबचे अमेरिकन कनेक्शन उघडकीस आले आहे. माहितीनुसार, अमेरिकन सरकारने वुहान लॅबला व्हायरसवर प्रयोगासाठी 28 कोटी रुपये दिले असल्याची माहिती काही कागदपत्रांवरून मिळाली आहे. हे रूपये गेल्या कित्येक वर्षात देण्यात आले होते. हा खुलासा झाल्यांनतर अनेक अमेरिकन नेतेही चकित झाले आहेत.

वुहान इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी येथे वटवाघुळाच्या प्रयोगादरम्यान कोरोना विषाणू फुटला असावा असे प्रश्न काहींनी चीनवर उपस्थित केले आहे आणि नंतर चीनने त्याला प्राणी बाजारातून पसरलेला विषाणू म्हटले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या आपत्कालीन समिती कोब्राच्या सदस्यांनीही लॅबमधून व्हायरस पसरवण्याच्या सिद्धांताला विश्वसनीय म्हटले आहे.

दुसरीकडे, अमेरिकन नेत्यांनी त्यांच्या देशाच्या वतीने चिनी प्रयोगशाळांना देण्यात येणाऱ्या निधीबाबत आक्षेप घेतला. काही अमेरिकन नेत्यांचे म्हणणे आहे की, हा निधी जनावरांच्या धोकादायक आणि हिंसक प्रयोगासाठी देण्यात आला होता. अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थांच्या वतीने वुहानच्या व्हायरलॉजी इन्स्टिट्यूटला 28 कोटी रुपये देण्यात आले. अमेरिकेचे खासदार मॅट गेट्झ म्हणाले- ‘ज्या चीन प्रयोगशाळेने जगात कोरोनाचा प्रसार केला त्या प्रयोगशाळेस अमेरिकेने निधी दिला या वृत्ताबद्दल मला वाईट वाटते आहे.’

शनिवारी अमेरिकेच्या व्हाईट कोट वेस्टचे अध्यक्ष अँथनी बेलॉटी यांनीही अमेरिकेला चीनला दिलेल्या मदतीचा निषेध केला. ते म्हणाले, ‘कदाचित असे होऊ शकते की चिनी प्रयोगशाळेत विषाणूंनी संक्रमित केलेले जीव किंवा अन्य कोणत्याही कारणाने आजारी व छळ केलेल्या जीवांवर प्रयोग पूर्ण झाल्यावर त्या प्राण्यांना बाजारात विकले गेले असेल.