Coronavirus : … म्हणून चीननं जगापासून लपवली ‘कोरोना’बद्दलची माहिती, अमेरिकेचा मोठा खुलासा

वॉशिंग्टन : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसनं जगभरात धुमाकूळ घातला असून, अमेरिकेला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेकडून वारंवार चीननं कोरोनासंदर्भातील माहिती लपवल्याचा आरोप वारंवार केला आहे. तसेच चीननं एका विशिष्ट उद्देशानं हा व्हायरस तयार केल्याचा आरोप देखील अमेरिकेकडून करण्यात येत होता. आता कोरोना व्हायरसची माहिती लपवण्यामागचा नवा खुलासा अमेरिकेनं केला आहे.

कोरोनाचं किती मोठ्या प्रमाणात संक्रमण झालं हे पाहण्यासाठीच चीननं माहिती लपवून ठेवली आहे. जेणेकरून ते इतर देशांना निर्यात करत असलेल्या वैद्यकीय पुरवठा वाढवू शकतील. असा नवा खुलासा अमेरिकेनं केला आहे. आहे. चीनने या व्हायरससंदर्भात माहिती लपवून ठेवल्याचे गुप्तचर दस्तऐवजांमधून उघड झाले आहे. होमलँड इंटेलिजन्स सिक्युरिटी (डिएचएस) विभागाच्या मेच्या अहवालानुसार, जानेवारीच्या सुरुवातीच्या काळात चीन नेत्यांनी जगभरात पसरलेल्या साथीच्या रोगाची तीव्रता जाणूनबुजून लपविली.

चीनने आयता वाढवली, निर्यात कमी केली
यानंतर अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने पुन्हा एकदा चीनवर टीकेची तोफ डागली. परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी रविवारी सांगितले की, व्हायरसच्या संक्रमणासाठी चीनला जबाबदार धरावे आणि त्यांची कारवाई देखील निश्चित केली जावी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांच्या राजकीय विरोधकांनी चीनवर टीका केल्यामुळे त्यांच्यावर निशाणा साधला होता. चीन हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार आहे, असं विरोधकांचं म्हणणं आहे. डईएचएसच्या विश्लेषणात म्हटले आहे की, कोरोना विषाणूची तीव्रता लपविताना चीनने आयात वाढविली आणि वैद्यकीय पुरवठ्यांची निर्यात कमी केली.

चीनच्या आयात आणि निर्यात वर्तनात बदल
अहवालात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचं संक्रमण झालं आहे हे चीननं जागतिक आरोग्य संघटनेलाही सांगितले नव्हते. जेणेकरून परदेशातून वैद्यकीय पुरवठा मागविता येईल. चीनने मास्क आणि सर्जिकल गाऊन आणि हातमोजे यांची आयात मोठ्या प्रमाणात वाढवली. चीनच्या आयात आणि निर्यात वर्तनात बदल झाल्याचंही जानेवारीपासून पहायला मिळत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ट्रम्प यांचा गुप्तचर यंत्रणेवर निशाणा
रविवारी ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांवर देखील निशाणा साधला होता. गुप्तचर यंत्रणांनी कोरोना व्हायरस किती भयंकर आहे हे आधीच स्पष्ट केलं नाही. गुप्तचर यंत्रणांना यासंदर्भात योग्य माहिती मिळाल्यानंतरही त्यांनी महत्त्वाची पावलं उचलली नसल्याचा आरोपच त्यांनी केला आहे.