Coronavirus : अमेरिकेच्या 2 खासदारांनी केलं स्वतःला घरात ‘कैद’, ‘कोरोना’ बाधिताशी केलं होतं ‘शेकहॅन्ड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोक स्वतःला घरात बंद करून घेत आहेत यावरून कोरोना विषाणूच्या भीतीचा अंदाज लावला जाऊ शकतो. अमेरिकेत या विषाणूपासून संक्रमित झालेल्यांची संख्या जवळपास ४१४ वर पोहोचली आहे, तर २१ लोकांचा मृत्यू झाला आहे. अशात एक वृत्त समोर आले आहे की अमेरिकेच्या दोन खासदारांनी स्वतःलाच नजरकैद करून घेतले आहे. म्हणजेच स्वतःच्या घरात स्वतःलाच कैद केले आहे.

एका वृत्तानुसार या अमेरिकन खासदारांची नावे टेड क्रूझ आणि पॉल गोसर अशी आहेत. दोन्ही अमेरिकन नेते रिपब्लिकन पक्षाचे आहेत. या दोघांना माहिती झाले होते की ते कोरोना विषाणूग्रस्त लोकांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांनी स्वतःला घरात कैद करून घेतले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त म्हणजे, २६ फेब्रुवारीला हे दोन्ही खासदार कॉन्झरवेशन पोलिटिकल अ‍ॅक्शन कॉन्फरन्सला गेले होते. या परिषदेचा विषय होता अमेरिका व्हर्सेस सोशालिजम. अमेरिकन कॉन्झर्व्हेटिव्ह युनियनचे अध्यक्ष मॅट श्लैप यांनी सांगितले की दोन्ही खासदारांचे कोरोना विष्णुग्रस्तांना भेटणे ही एक दुर्घटना होती. संक्रमित झालेल्या लोकांना वाटत होते की ते निरोगी आहेत. परंतु ते संक्रमित होते आणि त्यांच्यावर उपचार चालू होते.

खासदार टेड क्रूझ यांनी सांगितले की त्या परिषदेत ते कोरोना पीडित व्यक्तीशी फक्त एका मिनिटासाठी भेटले होते. हात मिळवला होता आणि थोडीशी चर्चा केली होती. तसेच क्रूझ यांनी सांगितले की सध्यातरी त्यांच्यावर कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. परंतु त्यांनी जाणीवपूर्वक टेक्सास येथील त्याच्या घरात स्वत:ला नजरकैद केले आहे, जेणेकरून कुणाला त्यांच्यापासून संसर्ग होऊ नये.

तसेच पॉल गोसर यांनी सांगितले की ते बराच काळ कोरोना विषाणूग्रस्त व्यक्तीसोबत होते. या कालावधीत त्यांनी अनेक वेळा त्या व्यक्तीशी हस्तांदोलन देखील केले. त्यांच्यात देखील तसे लक्षणे दिसलेली नाहीत. परंतु तरीही त्यांनी स्वतःला अ‍ॅरिझोनामधील त्यांच्या घरात कैद करून घेतले आहे. दरम्यान या दोन्ही खासदारांनी आपले कार्यालये देखील बंद केली आहेत. दोघेही आता १४ दिवसांनी आपल्या घरातून बाहेर निघणार आहेत आणि पुन्हा कोरोनाची तपासणी करणार आहेत. यानंतर ते सार्वजनिक जीवन जगतील.