लस घेतल्यानंतर ’सर्टिफिकेट’ घेणे का आवश्यक; जाणून घ्या रजिस्ट्रेशन आणि सर्टिफिकेट घेण्याची सोपी पद्धत

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसविरूद्ध लसीकरण सुरू आहे. लस दिल्यानंतर सर्टिफिकेट सुद्धा मिळते. आता प्रश्न हा आहे की, लस घेतल्यानंतर सर्टिफिकेटचे काम काय आहे? अशाच काही आवश्यक प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.

* कोरोना लसीसाठी नोंदणी कुठे करावी?
www.cowin.gov.in द्वारे कोरोना व्हायरसच्या लसीसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. येथे सर्व डिटेल्स द्याव्यात. उमंग आणि आरोग्य सेतु अ‍ॅपद्वारे सुद्धा नोंदणी करू शकता.

* कोणत्या वयाचे लोक लसीसाठी नोंदणी करू शकतात?
सध्या 18 वर्षावरील लोक व्हॅक्सीनसाठी नोंदणी करू शकतात.

* एका मोबाईल नंबरवर किती लोकांची नोंदणी होते?
एकाच मोबाइल नंबरवर 4 लोकांची नोंदणी होऊ शकते.

* ऑनलाइन सुविधा नसेल तर नोंदणी कशी होणार?
कुटुंबातील कोणताही एक सदस्य चार लोकांची नोंदणी करू शकतो. यासाठी मित्र किंवा कुटुंबाची मदत घ्या.

* आधार कार्डशिवाय लसीकरणाची नोंदणी होऊ शकते का?
होय, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड आणि वोटर आयडीने नोंदणी करता येते.

* नोंदणीसाठी पैसे भरावे लागतात का?
नाही, नोंदणीसाठी शुल्क नाही.

* अपॉईटमेंटची स्लिप डाऊनलोड करता येते का?
होय, एकदा नोंदणी झाल्यानंतर अपॉईंटमेंटची स्लिप डाऊनलोड करू शकता.

* जवळच्या लसीकरण केंद्र कसे समजणार?
यासाठी तुम्हाला पिनकोड टाकावा लागेल.

* लसीकरणाची तारीख आणि वेळ कुठून प्राप्त होईल?
अपॉईंटमेंट ठरल्यानंतर एसएमएसद्वारे लसीकरण केंद्र आणि तारीखेची माहिती मिळेल. ती प्रिंट करू शकता किंवा स्मार्ट फोनमध्ये ठेवू शकता.

* लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक का आहे?
ज्यांनी लस घेतली आहे त्यांच्यासाठी खुप आवश्यक आहे की त्यांनी व्हॅक्सीनेशनचे सर्टिफिकेट आपल्याकडे ठेवावे. आवश्यकता भासल्यास त्याचा वापर करू शकता. प्रवासासाठी हे उपयोगी आहे. सर्टिफिकेट घेण्यासाठी उमंग अ‍ॅपद्वारे किंवा कोविन पोर्टलवरून सुद्धा डाऊनलोड करू शकता.