आजपासून 18+ ला सुद्धा दिली जाणार व्हॅक्सीन, काही राज्यात होणार व्हॅक्सीनेशन तर काही ठिकाणी नाही, तुमच्या येथील स्थिती जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशभरात आज म्हणजे 1 मे पासून अनेक राज्यांत कोराना लसीकरणाचा तिसरा 18 प्लस टप्पा सुरु होईल, तर काही राज्यांनी लस उपलब्ध नसल्याने लसीकरण अश्यक्य असल्याचे म्हटले आहे. याच कारणामुळे लसीकरण महाअभियान सुरू होण्यापूर्वीच त्यास ‘ग्रहण’ लागल्याचे दिसत आहे.

पश्चिम बंगाल, कर्नाटक, ओडिसा, तमिळनाडु, झारखंड, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश इत्यादी राज्यांनी लसीची कमतरता असल्याने लसीकरण अभियान रद्द केले आहे. बिहार, पंजाब आणि महाराष्ट्राने गुरुवारीच लसीकरण अभियान पुढे ढकलल्याची घोषणा केली होती.

मात्र, महाराष्ट्रात काही ठिकाणी व्हॅक्सीन दिली जाईल. आजपासून 18 ते 45 वयोगटातील लोकांचे लसीकरण केले जाणार आहे. हा कोरोना विरूद्धचा लसीकरणाचा तिसरा टप्पा आहे. यापूर्वी हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 45 पेक्षा जास्त वयाच्या लोकांना व्हॅक्सीन दिली जात होती.

किती जणांनी केली नोंदणी
1 मे पासूनच्या लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर 28 एप्रिल सायंकाळी 4 वाजल्यापासून नोंदणी सुरू झाली होती आणि शुक्रवारी सकाळपर्यंत 2.45 कोटी लोकांनी आपली नोंदणी केली होती. परंतु, वृत्त असे आहे की बहुतांश राज्यांमध्ये लसीकरणसाठी स्लॉट दिले जात नाहीत. देशात आतापर्यंत 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना 15.48 कोटी डोस दिले गेले आहेत.

येथे होईल लसीकरण
उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात येथे आजपासून 18 प्लस लसीकरण सुरू होईल. तर दिल्लीत एकाच हॉस्पिटलमध्ये ते सुरू होणार आहे.

येथे होऊ शकणार नाही लसीकरण
महाराष्ट्र, पंजाब, प. बंगाल, कर्नाटक, अरूणाचल प्रदेश, ओडीसा, झारखंड, उत्तराखंड येथे लस उपलब्ध नसल्याने आजपासून लसीकरण सुरू होणार नाही.